Viral Video : मॅगी (Maggi) ही सगळ्यांचीच आवडती अशी डिश आहे. मॅगीचा चाहता वर्ग हा वेगळाच आहे. केवळ दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीचे वेड मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच आहे. मात्र, याच मॅगीवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नुकताच एका महिलेने मॅगी शिजवण्याचा वेगळा प्रयोग केला. या प्रयोगाला तिने मॅगी कॉटन कॅंडी (Maggi Cotton Candy) असे नाव दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. आता याची रेसिपी नेमकी कशी ते तुम्हीच पाहा.
महिलेने कॉटन कँडीपासून बनवली मॅगी :
सोशल मीडियावर वेळोवेळी विचित्र पाककृती असलेले पदार्थ पाहायला मिळतात. मात्र, यावेळी कॉटन कॅंडी मॅगी बनवणाऱ्या महिलेबद्दल लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडीओ पाहून मॅगीच्या चाहत्यांना धक्का बसेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक महिला मॅगीवर कसा प्रयोग करत आहे, हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
पाहा हा व्हिडीओ :
कॉटन कँडी मॅगीचा व्हायरल व्हिडीओ :
हा विचित्र पदार्थ बनवण्यासाठी महिलेने प्रथम एका पातेल्यात थोडे बटर टाकले आणि त्यात वेगवेगळ्या भाज्या भाजल्या. यानंतर तिने मीठ, पाणी आणि मसाले घातले. थोडा वेळ शिजल्यानंतर त्यात संपूर्ण कापूस कँडी घातला आणि मॅगी वितळेपर्यंत ढवळत राहिली. ही विचित्र रेसिपी पाहून बहुतेक मॅगी चाहत्यांनी संतप्त कमेंट्स दिल्या. तसेच या रेसिपीमुळे अनेक मॅगी लव्हर्स नाखूष झाले.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video : एकसारखी साडी नेसलेल्या अनेक महिला, तरी चिमुकल्याने अचूक शोधलं आपल्याच आईला! पाहा व्हिडीओ
- Trending Video : 'मैं झुकेगा नहीं'..नवजात बाळाचा ‘पुष्पा’ स्वॅग, चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले फॅन!
- Viral Video : मोराच्या अंड्याची चोरी करणं पडलं महाग, पुढे असं काही घडलं की...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha