Trending Andhra Pradesh Railway Station: आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टणम जिल्ह्यातील दुव्वाडा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. येथे एक विद्यार्थी रेल्वेमधून खाली उतरताना रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या अंतरात अडकली. अपघातानंतर लगेचच रेल्वे थांबवण्यात आली आणि रेल्वे पोलिसांनी विद्यार्थिनीला सुखरूप बाहेर काढलं. दुव्वाडाच्या सायन्स कॉलेजमध्ये एमसीएचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव शशिकला असून गुंटूर-रायगड एक्स्प्रेसमधून उतरताना प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधोमध ती अडकली होती. रेल्वेमधून उतरताना शशिकला पॅसेंजरच्या डब्यात आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. अडकल्याने सतत वेदना होत असल्याने ती व्हिडीओत रडताना दिसत आहे. आरपीएफ जवानांनी पीएफ कोपिंग तोडून तिला तेथून बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवर उतरताना शशिकला हीच पाय घसरला आणि ती प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये पडली. यावेळी तिने पाय वळला असता तो रुळात अडकला. शशिकला कॉलेजला जात होती आणि अण्णावरमहून दुव्वाडला पोहोचली होती. त्याचवेळी फलाटावर उतरताना पाय घसरल्याने हा अपघात झाला. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकल्यानंतर तिने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांनी तात्काळ रेल्वे चालकाला रेल्वे थांबवण्याचे आदेश दिले.
Andhra Pradesh Viral Video : दीड तास अडकली होती विद्यार्थिनी
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विद्यार्थिनी वेदनेने कळवळताना दिसत आहे आणि बचाव कार्यादरम्यान रेल्वे अधिकारी तिला धीर देत आहेत. लवकरच सर्व काही ठीक होईल असे रेल्वे अधिकारी तिला सांगताना आहेत. घटनेनंतर लगेचच रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी बचावकार्य सुरू केले. विद्यार्थिनीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्मचा एक भाग कापला. हे बचावकार्य दीड तास चालले, त्यानंतर जखमी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गुंटूर-रायगड एक्स्प्रेस दीड तास उशिराने सुटल्याने मार्गावरील इतर गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.