Worlds Longest Food Delivery : सिंगापूरच्या (Singapore) एका महिलेने चक्क अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) आपल्या ग्राहकांना फूड डिलीव्हरी (Food Delivery) केली. सिंगापूर ते अंटार्क्टिका ते 30,000 किमी जगातील सर्वात लांब फूड डिलीव्हरी तिने केली. मनसा गोपालने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अंटार्क्टिकाला फूड डिलीव्हरीच्या प्रवासाचा व्हिडीओ शेअर केला आहे.


हातात फूड पॅकेट घेऊन तब्बल 30,000 किलोमीटरचा प्रवास


व्हिडीओमध्ये ती हातात फूड पॅकेट घेऊन तब्बल 30,000 किलोमीटरचा प्रवास करताना दिसत आहे. या प्रवासाला तिने सिंगापूरमध्ये सुरुवात केली, नंतर हॅम्बर्ग, ब्युनोस, आयर्स आणि उशुआया येथे प्रवास केला, सर्वात शेवटी ती अंटार्क्टिकाला पोहोचली. क्लिपमध्ये मनसा अनेक बर्फाळ आणि चिखलाचे रस्ते ओलांडताना दाखवली आहे. पण शेवटी, ती तिच्या ग्राहकाला फूड डिलीव्हरी करते.


 






 


महिलेची पोस्ट व्हायरल


पोस्टमध्ये, तिने लिहिले, "आज, मी सिंगापूर ते अंटार्क्टिकाला एक विशेष फूड डिलीव्हरी केली! हे घडवून आणण्यासाठी @foodpandasg सोबत भागीदारी केली आहे. पृथ्वीवरील सर्वात दुर्गम ठिकाणांपैकी एक स्थान असे होते. जेथे ही फूड डिलीव्हरी करायची होती. सिंगापूरच्या अन्नाची चव इतर ठिकाणी पोहचवण्यासाठी तब्बल 30,000 किमी प्रवास करावा लागला." दुसर्‍या पोस्टमध्ये, तिने सांगितले की, ती 2021 मध्ये तिच्या अंटार्क्टिक मोहिमेसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत होती, त्यासाठी तिला ब्रँड मिळवायचा होता. त्यावेळी तिला एक महिन्यापूर्वी फूड पांडाकडून उत्तर मिळाले


 


सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ 38,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एका युजरने "अविश्वसनीय" अशी कमेंट केली तर दुसर्‍या युजरने"वेडी" असे लिहिले. तिसर्‍याने लिहिले, "व्वा... तुम्ही उत्कृष्ट वचनबद्ध काम केले आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच सिंगापूर ते अंटार्क्टिकापर्यंत इतकी लांब डिलिव्हरी केली." असे सांगत या महिलेचे कौतुक केले आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Satyendra Jain Viral Video : आपचे नेते सत्येंद्र जैन यांना तुरुंगात मसाज सुविधा? जेलमधील CCTV फुटेज समोर, व्हिडीओ व्हायरल