Railway Crossing Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) मागील काही दिवसांपासून अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशाप्रकारचे अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ (Amazing Video) पाहून नेटकरीही थक्क होतात. सध्या एक रेल्वे क्रॉसिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असताना दिसत आहे. ज्यामध्ये 'काळ आला, पण वेळ नव्हती' असे चित्र दिसून आले. काय घडले नेमके? 


 


 






'काळ आला, पण वेळ नव्हती'
आजकाल रेल्वे क्रॉसिंग ओलांडणारे निष्काळजी लोक सोशल मीडियावर अपघाताचे बळी ठरताना दिसत आहेत. यानंतरही अनेकजण जीवाची पर्वा न करता रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्याचा धोका पत्करत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्याच नादात रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना दिसत आहे. या दरम्यान रेल्वे रुळावर गाडी येताना दिसत आहे. रेल्वेरूळ ओलांडणारी महिली वेळीच लक्ष देते आणि तिथून निघून जाते. ज्याला पाहून सगळे तिला 'लकी लेडी' म्हणत आहेत.


 



आपल्याच नादात रेल्वे क्रॉसिंग ओलांडत होती, पुढे...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही क्लिप अरुप भट्टाचार्जी यांनी शेअर केली आहे. त्याच्या या व्हिडिओमध्ये एक महिला रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान ती जणू काय बागेत फिरत असल्याप्रमाणे आपल्याच नादात फिरताना दिसत आहे. यादरम्यान तिला रेल्वे ट्रॅकवरून समोरून येणारी ट्रेनही दिसत नाही आणि ती त्यावरून चालते. मात्र, ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू येताच, महिलेचे लक्ष त्याकडे जाते, आणि चक्क ट्रेन तिच्या दिशेने येताना दिसते. यानंतर महिला रेल्वे रुळावरून दूर जाताना दिसत आहे. जे पाहून सर्वांच्याच आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओला 25 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि एक लाख 18 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.