Viral Video : खेळाच्या मैदानावर रोमांचक सामने पाहताच क्रिडाप्रेमींमध्ये एक उत्साह संचारतो. आणि ते जल्लोष करताना दिसतात. आपल्या आवडत्या खेळाडूच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसतात. पण क्रिडा मैदानावर एकीकडे जेव्हा खेळ रंगताना दिसतो, त्यावेळी सर्व क्रिडाप्रेमी आनंद लुटताना दिसतात, तर दुसरीकडे प्रेक्षकांमधून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.  प्रेक्षकांमध्ये बसलेली एक महिला या खेळाकडे लक्ष न देता वेगळं काही करताना दिसली, आणि याचीच सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. 


 




 


 कॅमेरामनची नजर अचानक एका महिलेवर पडते आणि...
एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये पाहता येईल की, न्यू यॉर्कमध्ये यूएस ओपनचा सेमीफायनल सामना सुरू असतो. या दरम्यान उपस्थित लोकं या रोमांचक खेळाचा आनंद लुटताना दिसतात. या दरम्यान कॅमेरामनची नजर अचानक एका महिलेवर पडते. जी या खेळाकडे लक्ष न देता काहीतरी करण्यात मग्न असताना दिसली. आणि लोकांनी स्क्रीनवर या महिलेला पाहिले, तेव्हा सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. 


महिला स्वेटर विणताना दिसली


व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, रोमांचक सामन्याचा आनंद घेण्याऐवजी ती महिला प्रेक्षकांमध्ये बसून आरामात स्वेटर विणताना दिसत आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या यूएस ओपनच्या सेमीफायनलमध्ये हे दृश्य पाहायला मिळाले आहे. न्यूयॉर्कमधील आर्थर अॅशे स्टेडियमवर हा सामना खेळला जात होता. यावेळी मैदानावर स्पेनचा कार्लोस एलकराज आणि अमेरिकेचा फ्रान्सिस टियाफो यांच्यात रोमांचक सामना सुरू होता.


व्हिडीओ व्हायरल
या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चँटल मॅक्लॉने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सामनाच्या मध्यभागी विणकाम करणाऱ्या महिलेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


महत्वाच्या बातम्या :