Tesla Car Viral Video :  चीनमध्ये (China) टेस्ला कारचा (Tesla) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टेस्ला मॉडेलची 'वाय' कार रस्त्यांवर अचानक नियंत्रणाबाहेर गेली, त्यानंतर ही कार सुसाट वेगाने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेत लोकांना जीव गमवावा लागला.


टेस्ला कंपनीची 'वाय मॉडेल' कार पुन्हा एकदा चर्चेत 
जगात ऑटो ड्रायव्हर कार तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेली टेस्ला कंपनीची 'वाय मॉडेल' कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चीनमधील अशाच एका कारमध्ये अचानक काही 'तांत्रिक बिघाड' झाला, त्यानंतर ती भरधाव वेगाने रस्त्यावरून 'नियंत्रणाबाहेर' धावताना दिसली. गाडीचे नियंत्रण सुटल्याने बरेच नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.  


 






 


घटनेत दोघांचा मृत्यू झाला


सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टेस्लाची कार चीनच्या ग्वांगडोंगमध्ये पूर्ण वेगाने धावताना दिसत आहे. ही कार रस्त्यांवर भरधाव वेगाने धावण्याबरोबरच मोठा पराक्रम केला. व्हिडीओमध्ये कार समोरून जो कोणी येईल, त्या प्रत्येकाला धडक देताना दिसत आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीची सांगितली जात आहे, या अपघातात दुचाकीस्वार आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. व्हिडीओमध्ये ही कार भरधाव वेगाने धावताना आणि वाहनांना धडकताना दिसत आहे, काही वाहनांना धडकल्यानंतर ती काही वेळाने थांबली, तसेच कारच्या धडकेने झालेल्या दुखापतीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी चीनचे पोलीस तपासात गुंतले आहेत. त्याचबरोबर या घटनेमागची मुख्य कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.


टेस्लावर टीका


सध्या टेस्लाची कार रस्त्यावर अनियंत्रितपणे धावत आहे. या घटनेनंतर कंपनीच्या सुरक्षित तंत्रज्ञानाच्या दाव्यांचा पर्दाफाश होताना दिसत आहे. या अपघातानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचवेळी या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. जे पाहून सगळेच टेस्लावर टीका करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


NASA Artemis 1: मिशन मूनच्या आर्टेमिस-1 ने पृथ्वीचे अप्रतिम छायाचित्र टिपले! नासाकडून व्हिडीओ शेअर