Russia Ukraine War Viral Video : सोमवारी रशियाकडून (Russia-Ukraine War) युक्रेनवर ड्रोन हल्ले करण्यात आले. युक्रेनमध्ये ड्रोन हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात आले आहेत. अनेक रशियन ड्रोन युक्रेनच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताना दिसले आहेत. युक्रेनमधील युद्ध जवळून पाहणारे, रॉब ली यांनी कीव आणि सुमीच्या पूर्वेकडील प्रदेशाचे अनेक व्हिडीओ ट्विट केले. जे सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
रॉब ली यांनी सोमवारी युक्रेनची राजधानी कीव आणि सुमीच्या पूर्वेकडील प्रदेशाचे अनेक व्हिडीओ ट्विट केले. जेथे गेरान -2 फिरताना दिसत आहे. हे ड्रोन उडत येतात आणि त्यांच्या लक्ष्यांवर हल्ला करत असल्याचे दिसत आहे. दुसर्या व्हिडिओमध्ये समोरून येणाऱ्या ड्रोनवर क्षेपणास्त्र दिसत आहे. त्यानंतर ड्रोन लक्ष्यावर आदळतो. आणखी एका फुटेजमध्ये गेरान-2 ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. हे रशियन ड्रोन, परिसरावर फिरत, दिलेले लक्ष्य शोधून त्यावर मारा करते.
युक्रेनच्या लोकांक़डून हल्ल्यांचा निषेध
अनेक युक्रेनियन नागरिकांनी नष्ट झालेल्या अपार्टमेंटचे फोटो ट्विट केले आणि ड्रोन हल्ल्यांचा निषेध केला. त्यांचे म्हणणे आहे की, ड्रोन हल्ल्यामुळे नागरी क्षेत्र प्रभावित झाले. युक्रेनच्या एका नेत्याने हल्ल्याचा व्हिडीओ ट्विट केला आणि लिहिले की, आज सकाळी रशियाने इराण निर्मित ड्रोनने कसा हल्ला केला ते या व्हिडीओमध्ये पाहता येईल. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. बचावकर्ते नागरिकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत आहेत. युक्रेनच्या राजधानीवर हा दुसरा रशियन दहशतवादी हल्ला आहे.
मृतांमध्ये गर्भवती महिलेचा समावेश
कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की राजधानीत ठार झालेल्या सहा लोकांपैकी दोन तरुण विवाहित जोडपे होते. त्याचवेळी एएफपी या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, "मुलाची अपेक्षा करणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही महिला सहा महिन्यांची गर्भवती होती." रशियानेही सोमवारी युक्रेनवर किमान 84 क्षेपणास्त्रे डागली होती. ज्यामध्ये युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 19 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनने म्हटले आहे.