Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लाल नदी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पाहून काही काळासाठी, यूजर्सना आश्चर्य वाटले की ही रक्ताची नदी आहे का? मात्र, ही नदी ना रक्ताची आहे, ना हे वाहणारे पाणी कोणत्या नदीचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की काय आहे? 



रस्त्यावर प्रचंड वेगाने वाहत असलेली रक्ताची नदी?
हा व्हायरल व्हिडीओ पोर्तुगालमधील किनारपट्टीवरील गावातील आहे. साओ लोरेन्झो डी बैरोच्या रस्त्यावर तुम्हाला दिसणारे लाल रंगाचे पाणी पाणी नसून लाल वाइन आहे. काही दिवसांपूर्वी पोर्तुगालमधील एका वाईनरीच्या दोन टाक्यांमध्ये अचानक स्फोट झाला, ज्यामुळे साओ लोरेन्झो डी बैरो येथील एका गावाच्या रस्त्यावर 6,00,000 गॅलन रेड वाईन अचानक वाहू लागली. रस्त्यावर प्रचंड वेगाने वाहत असलेली ही रेड वाईन पाहून लोकही थक्क झाले. आता या घटनेचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दारू रस्त्यावर नदीसारखी वाहत असल्याचे दिसून येते. 2000 हून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात डोंगराळ भागातून लाल दारू वाहत होती.


 






 


मोठे नुकसान, वाईनरीने घेतली जबाबदारी
या घटनेत केवळ रस्ताच नव्हे तर आजूबाजूच्या तळघर, शेततळे, माती आदींचेही मोठे नुकसान झाले आहे. लेविरा डिस्टिलरीने सोमवारी या घटनेवर दिलगिरी व्यक्त केली, तिच्या मालकीच्या रेड वाईनच्या दोन टाक्यांमध्ये झालेल्या स्फोटामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. लेविरा डिस्टिलरीने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून नुकसान भरून काढण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय स्फोटामागील कारणांचाही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


 


22 लाख लिटर रेड वाईनचे नुकसान
साफसफाई आणि दुरुस्तीसाठी जो काही खर्च येईल तो उचलण्यास तयार असल्याचे डिस्टिलरीने सांगितले. शेतातील दारूमुळे खराब झालेली माती विशेष उपचार केंद्रात नेण्यात आली आहे. 22 लाख लिटर रेड वाईन नष्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.


 


इतर बातम्या


Husbands Legal Rights: पत्नीप्रमाणेच पतींनाही कायदेशीर अधिकार; कोणत्याही प्रकारे छळ झाल्यास वापरू शकतात, जाणून घ्या