Artificial Mini Eye : जगभरातील शास्त्रज्ञांकडून ( Scientist ) विविध विषयांवर संशोधन सुरु असतं. आता शास्त्रज्ञांनी कृत्रिम डोळा ( Artificial Eye ) तयार केला आहे. याआधी शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कृत्रिम रक्तही तयार केलं आहे. आता शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये आर्टिफिशियल डोळ्याने जग पाहता येणार आहे. हा कृत्रिम डोळा मानवी नैसर्गिक डोळ्याप्रमाणे काम करेल. थ्रीडी मिनी आयला ( 3D Mini Eye ) रेटिनल ऑर्गेनॉयड्स ( Retinal Organoids ) असं म्हटलं गेलं आहे. हा कृत्रिम डोळा बनवण्यासाठी मानवी त्वचेचा वापर करण्यात आला आहे. लंडन विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी या कृत्रिम डोळ्याचा शोध लावला आहे. या मिनी थ्रीडी डोळ्यामध्ये डोळ्याची बाहुली आणि रेटिना देखील आढळते. या मिनी आयचा मानवांसाठी कसा उपयोग होईल ते जाणून घ्या.


माणसांला 'या' कृत्रिम डोळ्याचा कसा फायदा होईल?


शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी कृत्रिम डोळा तयार करण्यासाठी प्राण्यांच्या पेशींवर संशोधन केले गेले होतं, पण याचे चांगले परिणाम मिळाले नाहीत. आता मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलेल्या मिनी आयमधून अनेक गोष्टी शोधल्या जाऊ शकतात. एखाद्या व्यक्तीची पाहण्याची क्षमता कशी जाते, हे शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. याशिवाय डोळ्यांशी संबंधित अनुवांशिक आजारांसंदर्भात संशोझन सुरु आहे, यामुळे भविष्याच डोळ्यांसंबंधित आजारांवरील उपचारात मदत होऊ शकेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मिनी आयवरील संशोधनामुळे वयाच्या पन्नाशीनंतर होणार्‍या मॅक्युलर डिजेनेरेशनवर उपाय शोधण्यात मदत होईल. मॅक्युलर डिजेनेरेशन आजारामध्ये डोळ्यांची दृष्टी कालांतराने कमी होऊ लागते.


3D Mini Eye नैसर्गिक डोळ्याप्रमाणेच करणार काम


स्टेम सेल रिपोर्ट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, हा 3D मिनी डोळ्यातील रॉड सेल्स ( Rod Cell ) डोळ्यांच्या रेटिनामध्ये तयार करण्यात आल्या आहेत. डोळ्यांच्या मागील भागात रॉड सेल्स आढळतात. या पेशी माणसाला वस्तू पाहण्यास किंवा त्याचं दृष्यं किंवा प्रतिमा तयार करण्यास मदत करतात. या पेशी प्रतिमा पाहणं सोपं करतात. लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या डोळ्यांमध्येही अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे.


डेलीमेलच्या वृत्तानुसार, मिनी आय तयार करण्यासाठी, संशोधकांनी अशर सिंड्रोमने पीडित तरुण रुग्णाच्या त्वचेच्या पेशी गोळा केल्या. यापासून स्टेम सेल्स तयार करण्यात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत कृत्रिम डोळा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये शास्त्रज्ञांनी हळूहळू संशोधन करत कृत्रिम डोळ्यात सात प्रकारच्या पेशी तयार केल्या, ज्याचा पातळ थर प्रकाश ओळखून प्रतिमा तयार करु शकतो.


Prosthetic Eye म्हणजे काय?


दरम्यान, या आधीही शास्त्रज्ञांनी कृत्रिम डोळा तयार केला आहे. याला Prosthetic Eye असं म्हटलं जातं. मात्र, Prosthetic Eye आणि 3D Mini Eye पूर्णपणे वेगळे आहेत. Prosthetic Eye म्हणजे काचेचा किंवा बनावट डोळा, ज्यामध्ये डोळ्यासारखं दिसणारं एक कवच असतं. हा प्रोस्थेटिक डोळा फक्त एक कवच असून तो नैसर्गिक डोळ्याप्रमाणे काम करत नाही. Prosthetic Eye मधून दिसत नाही. Prosthetic Eye फक्त डोळ्याच्या जागी बसवण्यात येणारा काचेचा गोळा आहे, जो दिसायला डोळ्याप्रमाणे असतो. डोळा गमावलेल्या रुग्णांमध्ये हा काचेचा डोळा लावण्यात येतो.


3D Mini Eye काय आहे?


मात्र, 3D Mini Eye हा कृत्रिम डोळा मानवाच्या नैसर्गिक डोळ्याप्रमाणे काम करेल.  3D मिनी डोळ्या द्वारे मानवाला जग पाहता येईल. 3D Mini Eye नैसर्गिक डोळ्याप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या प्रतिमेचे फोटो मेंदूला पाठवेल. या 3D Mini Eye मुळे डोळे गमावलेल्या रुग्णांना जग पाहणं सोपं होणार आहे.