Viral Video : रंगीबेरंगी फुगे दिसल्याबरोबर लहान मुलं लगेच आकर्षित होतात, तसेच त्यांचे पालकही ते लगेच विकत घेतात. मात्र हेच फुगे मुलांसाठी किती घातक आहेत. याचा जराही अंदाज त्यांच्या पालकांना नसतो. जर तुम्हीही तुमच्या मुलांना हे गॅसचे फुगे खेळण्यासाठी देत असाल, तर आता तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण आजकाल, इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. (Helium Balloon Blast Marathi News)


इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल


आजकाल, इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेलियम वायूने भरलेली खेळणी किती धोकादायक ठरू शकतात हे दर्शविण्यात येते. हेलियम वायू फुग्यांमध्ये भरलेला आढळतो. हेलियम हे हलके असल्याने विविध फुग्यांसह अनेक प्रकारच्या खेळण्यांमध्ये भरले जाते. तेव्हा शक्यतो फुग्यांसारखी खेळणी हेलियम वायूने ​​भरलेली असते. नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये हेलियम वायूने भरलेल्या बॉलमुळे मुलाला आणि त्याच्या आईला किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्ही पाहू शकाल.


एक मूल हेलियम वायूने ​​भरलेल्या चेंडूशी खेळत होते, आणि अचानक...




सोशल मीडीयावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या मुलासोबत दिसत आहे. त्या मुलाच्या हातात हेलियम वायूने ​​भरलेला बॉल आहे. आई तिच्या कामात आहे. खेळता खेळता मूल आईकडे येते आणि आपल्या हातातील बॉल तिच्या दिशेने फेकते. तेवढ्यात चेंडू सरळ जाऊन ड्रायरला आदळतो आणि त्याच्या उष्णतेमुळे चेंडूचा स्फोट होतो. चेंडूचा स्फोट होताच आगीच्या प्रचंड ज्वाळा बाहेर पडतात.


अशी खेळणी खरेदी करताना काळजी घ्या!


सोशल मीडीयावर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हेलियम वायू ज्वलनशील नाही. या कारणासाठी ते मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हेलियम देखील सुरक्षित मानले जाते. परंतु अनेक ठिकाणी हेलियममध्ये इतर वायू देखील मिसळले जातात, ज्यामुळे ते ज्वलनशील बनतात. हेच कारण आहे की फुगे किंवा बॉल यांसारखी हेलियमने भरलेली खेळणी खरेदी करताना  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.