Sunil Gavaskar: माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या क्रिकेट (Cricket) जगतात होत आहेत. या वक्तव्यात सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या कामावर निराशा व्यक्त केली, परंतु माझ्या वडिलांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं त्यांच्या मुलाने स्पष्ट केलं आहे. मुळात सुनील गावस्कर यांच्या नावाने खोटी बातमी पसरवण्यात आली होती. बीसीसीआयच्या राजकारणामुळे क्रिकेट बरबाद झालं असल्याचं सुनील गावस्कर म्हणत असल्याची ती बातमी होती.


नेमकं घडलं काय?


आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेत शनिवारी (2 ऑगस्ट) टीम इंडियाचा पाकिस्तानशी सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराशाजनक कामगिरी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीमुळे सोशल मीडियावर टिकेची झोड उठली होती. पण पावसामुळे सामना रद्द झाला. या सामन्यानंतर सुनील गावस्कर यांच्या नावाने एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं. या वक्तव्यात सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटच्या बरबादीचं कारण बीसीसीआयचं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. मात्र या वक्तव्यामागचं सत्य आता समोर आलं आहे.


व्हायरल झालेल्या खोट्या वक्तव्यात नेमकं काय म्हटलं गेलं?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज काहीसा असा होता... सुनील गावस्कर यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, "राजकारणामुळे क्रिकेटचा सुंदर खेळ उद्ध्वस्त झाला आहे आणि ही भारतीयांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बीसीसीआयने भारताला निराश केलं आहे आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्याचे निकाल याचा पुरावा आहेत."


अनेक जणांनी उपस्थित केला प्रश्न


हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी प्रश्न उपस्थित केला. सुनील गावस्कर यांनी हे खरंच म्हटलं आहे का? असा प्रश्न अनेकजण विचारायला लागले. मात्र, आता या व्हायरल मेसेजमागचं सत्य समोर आलं आहे. सुनील गावस्कर यांचा मुलगा आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रोहन गावस्कर याने हे वक्तव्य खोटं असल्याचं म्हटलं आहे.


दावा खोटा असल्याचं झालं सिद्ध


रोहन गावसकरने म्हटलं की, माझ्या वडिलांनी असे कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पुढे रोहन गावस्कर याने म्हटलं की, "माझे वडील सुनील गावस्कर यांच्या नावाने खोटे मेसेज पसरवले जात आहेत. माझ्या वडिलांच्या नावाने पसरवली जात असलेली ही खोटी बातमी आहे. माझ्या वडिलांनी असं कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणाने खोटे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. लोक लक्ष वेधण्यासाठी आणि स्वत:च्या पोस्टवरील एंगेजमेंट वाढवण्यासाठी इतरांच्या नावाने खोट्या गोष्टी पसरवतात, हे फार वाईट आहे. हे ट्वीट रिट्वीट करून सत्य समोर आणण्यास मदत करा." तसेच, रोहन गावस्करनं हेदेखील स्पष्ट केलं आहे की, माझ्या वडिलांचा करार इंडिया टुडेसोबत आहे, त्यामुळे ते एनडीटीव्हीला बाईट देऊच शकत नाहीत. 


तो आज भारताशी करारात आहे त्यामुळे तो Ndtv सोबत काहीही बोलणार नाही!






रोहन गावसकर यांनी जरी आपले वडील सुनील गावसकर यांच्या नावाचा वापर हे खोटं वक्तव्य पसरवण्यासाठी केल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी सुनील गावस्कर यांनी या फेक न्यूजवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ishan Kishan Girlfriend : पाकिस्तान विरोधात ईशान किशनची दमदार खेळी, गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल; कोण आहे आदिती हुंडिया? जाणून घ्या...