Viral Video : प्रत्येकाने वाहतुकीचे नियम (Traffic Rules) पाळले पाहिजेत, अन्यथा कधी कधी त्याचे गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागतात. मात्र, त्याची तमा न बाळगता लोक बिनधास्तपणे वाहतुकीचे नियम तोडताना दिसतात. त्यामुळेच अनेकदा अपघात होत आहेत. तुम्ही अनेकदा माणसांना वाहतुकीचे नियम मोडताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी कोणता प्राणी वाहतुकीचे नियम पाळताना पाहिलं आहे का? आजकाल असाच एक व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, जो तुमचे मन नक्कीच जिंकेल.


वाहतुकीचे नियम पाळणारा 'श्वान'


या व्हिडीओमध्ये एक श्वान वाहतुकीचे नियम पाळताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक मुलगा आणि एक मुलगी रस्ता ओलांडण्यासाठी उभे होते. त्यांच्या शेजारी एक श्वानही उभा होता. रस्ता ओलांडता यावा म्हणून हे सर्वजण सिग्नल लाइट लाल होण्याची वाट पाहत होते. मग काही सेकंदात सिग्नल लाल होतो, वाहने थांबतात आणि लोक इकडून तिकडे रस्ता ओलांडू लागतात. काही लोक वाहनांच्या मधोमध, तर काही झेब्रा क्रॉसिंगवरून जातात. पण त्या श्वानाला झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडणे योग्य वाटले. श्वानाची ही बुद्धिमत्ता आपल्याला शिकवते की, जर प्राणी हे करू शकतो तर आपण का नाही?


 


 






 


पाहा श्वानाचा अप्रतिम व्हिडिओ


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे आणि 'श्वान' सुद्धा वाहतूक नियमांचे पालन करतात' असे कॅप्शन लिहिले आहे. अवघ्या 22 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्ही कुत्र्यांना खेळताना, धावताना खूप पाहिलं असेल, पण त्यांना ट्रॅफिकचे नियम हुशारीने पाळताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच श्वानाचे कौतुक कराल. 


 


महत्त्वाच्या बातम्या : 


Viral Video : लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरा बसला आंदोलनाला, ठेवली अनोखी अट! म्हणाला - आधी 'हे' झालेच पाहिजे