Viral: दैनंदिन जीवनात अनेक लोक आपल्या नोकरी व्यतिरिक्त काहीतरी वेगळी कमाई करतात. यासाठी अनेकजण साईड बिझनेस करतात. आजकाल अनेक गोष्टींचे भाव वाढत चालल्याने केवळ एका पगारात अनेकांचे भागत नाही. त्यासाठी घरातील सदस्य इतर कोणतेही काम करून पैसे कमावतात. आजकाल लोक अतिरिक्त उत्पन्नासाठी विविध प्रकारची कामे करतात आणि काहीवेळा नवीन मार्ग शोधतात, जेणेकरून त्यांना काही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की कानातला मळ विकून पैसे कमावता येतात? होय, हा काही विनोद नाही. एका महिलेने सांगितले आहे की ती कानातला मळ विकून चांगले पैसे कमवत आहे. ही महिला सोशल मीडिया एन्फ्लुएंसर आणि कंटेट क्रिएटर आहे. 


महिला कानातला मळ विकून पैसे कमावते


या महिलेचे नाव लतिशा जोन्स आहे, सोशल मीडिया एन्फ्लुएंसर आणि कंटेट क्रिएटर महिलेने असे काहीतरी करण्याचा मार्ग शोधला आहे जे बहुतेक लोक करू इच्छित नाहीत. बरं, हे काम अगदी किळसवाणं वाटतं. डेली स्टारच्या वृत्तात म्हटले आहे की लतिशा एक टिकटोकर आहे, जी कानातला मळ विकून अतिरिक्त पैसे कमवत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की लतिशाने अलीकडेच एका व्हिडिओमध्ये तिची एक बाजू शेअर केली आहे. याद्वारे ती दररोज 9,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम कमावते. हे काम थोडे विचित्र आणि किळसवाणे असले तरी यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.


लोक त्यांना हवे ते पैसे देतात


लतीशाने सांगितले की, ती तिच्या साईड बिझनेससाठी कॉटन बड्सने कान स्वच्छ करते. ते हे वापरलेले इयरबड्स इअर वॅक्ससह सीलबंद बॅगमध्ये पॅक करते आणि नंतर ग्राहकांना पाठवतात. मनोरंजक गोष्ट अशी आहे की असे काही लोक आहेत जे या उत्पादनासाठी पैसे देण्यास तयार आहेत. लतिशाने सांगितले की ग्राहकांना कानातला मळ देखील आवडतो. ती म्हणाली की जेवढा मळ आहे, तेवढे पैसे द्यायला तयार होतील. तिच्या पार्सलला वैयक्तिक स्पर्श जोडण्यासाठी, लतीशा प्रत्येक ऑर्डरसह एक कार्ड सुद्धा देते, बहुतेकदा ती खरेदीदाराला पाठवण्यापूर्वी त्यावर किस करून ठेवते.


हेही वाचा>>>


Viral: पुण्याच्या FC रोडवर फिरतोय पंजाबी गायक 'दिलजीत दोसांझ'? व्हायरल व्हिडीओचे सत्य काय? नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )