Viral Video of Old Man Singing for Father : जगात आई-वडीलांहून कुणीही श्रेष्ठ नाही. जगातलं सर्व सुख एकीकडे आणि आई-वडीलांचं (Parents) प्रेम एकीकडे. आई-वडील ज्या निस्वार्थ भावनेनं आपल्यावर प्रेम करतात ते प्रेम आपल्याला इतर कुणीही देऊ शकत नाही. पण हे सुख प्रत्येकाला मिळत असं नाही आणि ज्याला मिळत त्यापैकी काहींना त्यांची किंमतही नसते. आई-वडीलांच्या वृद्धापकाळात मुलांनी त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण काही जण पैसा आणि धावत्या आयुष्याच्या मागे लागून आई-वडीलांना वृद्धाश्रमात पाठवतात. याचे अनेक फोटो, व्हिडीओ किंवा बातम्याही अनेक वेळेला समोर येतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ काहीसा याच्या उलट आहे. 105 वर्षांच्या वडीलांची काळजी घेत त्यांच्या 75 वर्षाचा मुलगा त्यांच्यासाठी गाणं गाताना दिसत आहे.


105 वर्षाच्या वडीलांसाठी 75 वर्षाच्या आजोबांनी गायलं गाणं


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये वृद्ध पिता-पुत्रांचं प्रेम दिसून येत आहे. 75 वर्षांचे आजोबा त्यांच्या 105 वर्ष वय असलेल्या वडीलांसाठी गाणं गाताना पाहायला मिळत आहे. पिता-पुत्रांचा हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.


पाहा व्हायरल व्हिडीओ : वृद्ध पिता-पुत्रांमधील भावनिक क्षण






वृद्ध पित्यासाठी मुलाचं प्रेम पाहून अनेक नेटकरी भावूक


व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजोबा पलंगावर त्यांच्या वृद्ध वडीलांशेजारी बसलेले दिसत आहेत. 75 वर्षांचे आजोबा त्याच्या वडीलांसाठी शिट्टी वाजवत गाणं गात असल्याचं दिसत आहे. वृद्ध पित्यासाठी मुलाचं प्रेम पाहून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत. व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक युजरच्या डोळ्यातून जणू आनंदाश्रू वाहत आहेत. 


हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये वृद्ध मुलगा वडीलांसाठी गाणं गात त्यांना लहान मुलांप्रमाणे थोपटताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर भावूक कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, 'वृद्ध व्यक्ती ईश्वराप्रमाणे असतात. त्यांची काळजी घेऊन त्यांना प्रेम आणि सन्मानपूर्ण वागणूक द्यायला हवी.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Viral Post : 'तुझी कामाची वेळ संपली, आता घरी जा'; शिफ्ट संपल्यावर 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कम्प्युटरवर येतो मेसेज