Viral: सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एका व्यक्तीने चक्क 40 लाख रुपये किमतीची टेस्ला कंपनीची कार 'बैलगाडी'मध्ये बदलली आहे. तसं पाहायला गेलं तर टेस्लाची कार जगभरात चर्चेत आहे. या कारला तिच्या फीचर्समुळे जगभर पसंती दिली जाते, तसेच या गाडीला खूप मागणी आहे, पण आता चीनमधील एक व्यक्ती याच टेस्ला कारवर इतका नाराज झाला की, त्याने टेस्लाच्या कारचे बैलगाडीत रूपांतर केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


टेस्ला कारमालक संतापला, बैलाला गाडी जोडून निषेध केला


त्याचं झालं असं की, चीनमधील एका व्यक्तीने सेकंड हँड टेस्ला मॉडेल 3 विकत घेतले, ज्याची किंमत 101,000 युआन (11 लाख रुपये) आहे, परंतु ते खरेदी केल्यानंतर त्याला समजले की, ते चार्ज करणे शक्य नाही. त्याच्या या तक्रारीवर कोणताही तोडगा न निघाल्याने त्याने संतप्त होऊन बैलासह गाडी ओढून निषेध केला. चीनमधील टेस्लाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, चीनमध्ये या मॉडेलची सध्याची किंमत 335,900 युआन (सुमारे 40 लाख रुपये) पासून सुरू होते. कार घेतल्यानंतर, जेव्हा ती व्यक्ती गाडी चालवत होती, तेव्हा त्याला समजले की, कारमध्ये काही समस्या आहे, ज्यामुळे ती चार्ज होऊ शकली नाही.






 


कारमालकाने अधिकृत निवेदन देखील जारी केले..


गुआजी नावाच्या कंपनीच्या मदतीने या व्यक्तीने कार खरेदी केली होती. गुआजीने 23 ऑक्टोबर रोजी एक अधिकृत निवेदन देखील जारी केले की कार विकणारा एक कार डीलर होता आणि त्याने सुमारे 30 वेळा हीच कार विक्री आणि खरेदी केली होती. कार खूप चालवली गेली असल्याने ती अनेक वेळा खराब झाली होती. 


ग्राहकाला परतावा जारी


कंपनीने सांगितले की, या वाहनाला डी-ग्रेड दर्जा देण्यात आला असून, ते सावधगिरीने खरेदी करायला हवे होते. जरी टेस्लाची बॅटरी खराब झाली असले तरी, आम्ही प्री-सेल चाचणीमध्ये बॅटरीचा समावेश करत नाही. तरीही, कंपनीने रिटर्नची प्रक्रिया पूर्ण करून ग्राहकाला परतावा जारी केला आहे.


हेही वाचा>>>


Viral: हा काय प्रकार..! गुन्हेगारांना पकडण्याऐवजी पोलीस गातायत भजन? व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांना धक्का


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )