Viral: छठपूजनिमित्त सध्या ट्रेनमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशात लोकांना घरी जाण्यासाठी ट्रेनच्या सीट्स उपलब्ध नाहीत, परिणामी प्रवाशांना बाथरूममध्ये बसून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक म्हणतायत की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांपेक्षा कोणी कमी नाही..


ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने प्रवाशाने केला जुगाड!


भारतीय रेल्वेचा एका व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका व्यक्तीला ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने त्याने दोरीने स्वतःसाठी वेगळी सीट बनवली. या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,  एका व्यक्तीला ट्रेनमध्ये सीट न मिळाल्याने त्याने एक अनोखी युक्ती वापरली ज्यामुळे नेटकरीही आश्चर्यचकित झालेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याचे दिसत आहे. सर्व जागा जवळपास भरल्या आहेत आणि काही लोक उभे आहेत. दरम्यान, एक व्यक्ती दोन सीटच्या मध्ये दोरी बांधत आहे, तो असे करत आहे, जेणेकरून तो त्यावर बसून किंवा झोपून प्रवास करू शकेल.


जुगाडचा व्हिडीओ व्हायरल


ट्रेनमधील हा प्रवासी दोन सीटमध्ये दोरी बांधून स्वतंत्र सीट तयार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भारतीय लोकांच्या जुगाडला तोड नाही, असे लोक म्हणत आहेत. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे, तर मोठ्या संख्येने लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिलंय की, विकसित आणि आत्मनिर्भर भारतातील आजचे तरुण इतके स्वावलंबी झाले आहेत की ते ट्रेनमध्ये बसण्यासाठी स्वतःची जागाही बनवत आहेत. दुसऱ्या यूजरने लिहिले की, आपल्या देशातील रेल्वे प्रवासी केवळ हुशार नसून अतिशय सर्जनशील आणि लढाऊ वृत्तीचे देखील आहेत.






आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही, नेटकऱ्यांचे कमेंट


दुसऱ्याने लिहिले की, आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही, त्यांना योग्य दिशा देण्यासाठी आम्हाला फक्त एक चांगले सरकार हवे आहे. एकाने लिहिले, गरीब माणसाने काय करावे, तिकीटच इतके महाग आहे. दुसऱ्याने लिहिले की, तिकीट महाग आहे. पण तेही उपलब्ध नाही. तिकीट मिळणे ही लढाई जिंकण्यापेक्षा कमी नाही.


हेही वाचा>>>


Viral: 'सण प्रत्येकासाठी सारखेच नसतात!' दिवाळीत डिलिव्हरी बॉयने तब्बल 6 तास काम केलं, पण कमाई पाहाल तर डोळे भरून येतील


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )