Trending News in Marathi : आजकाल निष्काळजीपणाची प्रकरणं फार वाढत चालली आहेत. काही लोकांच्या बाबतीत त्यांच्या कामामध्ये निष्काळजीपणा दिसून येतोय. त्यामुळे अशी प्रकरणे रोज समोर येत आहेत. नुकतंच राजधानी एक्स्प्रेसच्या (Rajdhani Express) बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजधानी एक्सप्रेसमधील केटरिंग विभागाच्या निष्काळजीपणामुळे सोशल मीडियावर यूजर्स प्रचंड संतापलेले दिसत आहेत.
केटरिंग विभागाच्या चुकीमुळे रेल्वे विभागाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लहान मुलीसाठी ऑम्लेट (Omelette) मागवले होते. ज्यामध्ये केटरिंग विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना अन्नात झुरळ आढळून आले. संबंधित प्रकारानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
Marathi Viral News : ऑम्लेटमध्ये झुरळ आढळले
अडीच वर्षांच्या मुलीच्या ऑम्लेटमध्ये झुरळ आढळून आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. यानंतर मुलीचे वडील योगेश मोरे यांनी सोशल मीडियावर झुरळांसह या ऑम्लेटचा फोटो पोस्ट केला आहे आणि ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,"16 डिसेंबर रोजी, आम्ही दिल्लीहून (22222) प्रवास करत होतो. सकाळी, आम्ही बाळासाठी एक्स्ट्रा ऑम्लेट ऑर्डर केले. त्यात आम्हाला काय आढळलं ते तुम्हीच पाहा. माझी मुलगी 2.5 वर्षांची आहे तिला जर काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार?" असं म्हणत त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे.
Marathi Viral News : फोटो पाहिल्यानंतर यूजर्स थक्क
योगेश मोरे नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ऑम्लेटवरील झुरळ स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोमधून राजधानी एक्स्प्रेसच्या केटरिंग विभागाकडून झालेला निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसतोय. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. हे पाहिल्यानंतर युजर्सही प्रचंड घाबरलेले दिसत आहेत. त्याचबरोबर संतापही व्यक्त केला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या :