Viral News : एअरपॉड्समुळे (Airpods) गाणी ऐकणे किंवा मोबाइलवर कोणाशीही बोलणे खूप सोपे झाले आहे. ब्लूटूथ द्वारे कनेक्ट केल्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण संगीत ऐकू शकतो. एअरपॉड्स सारखे हे छोटे गॅजेट गिळल्यास काय होईल? याची कल्पना न केलेलीच बरी असाच काहीसा प्रकार अमेरिकेत घडला, जिथे एका महिलेने तिच्या मित्राशी बोलत असताना चुकून एअरपॉड गिळला.
महिलेनी सांगितला किस्सा, सोशल मीडियावर व्हायरल
यूटाह येथील रहिवासी असलेल्या 52 वर्षीय टैना बार्करने TikTok वर एअरपॉड्स गिळण्याची कहाणी सांगितली. त्यांची ही कहाणीही वेगाने व्हायरल झाली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बार्करचा दावा आहे की, त्याने एअरपॉड्स हे व्हिटॅमिन्स आहे असे समजून ते गिळले. ज्यांनी हे ऐकले असेल त्याला आश्चर्य वाटले असेल की कोणीही एअरपॉड्स का खाईल? एअरपॉड्स प्लास्टिकचे बनलेले असतात, याचा अर्थ ते पोटात गेल्यास ते तुमच्या शरीराचे नुकसान करू शकतात.
"....आणि मी माझी व्हिटॅमिनची गोळी घेतली"
बार्करने या घटनेबाबत सांगितले, ती म्हणाली, "या संवादादरम्यान मी माझी व्हिटॅमिनची गोळी घेतली. व्हिटॅमिन घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायले आणि मग मला काहीतरी अडकल्यासारखे वाटले. मी आणखी पाणी प्यायले आणि मग माझ्या मित्राचा निरोप घेतला. मग मी पाहिले की माझ्या हातात एअरपॉड्स केस आणि व्हिटॅमिनची गोळी आहे. जेव्हा मी केस उघडले, तेव्हा एअरपॉड गायब होता. तेव्हा मला जाणवले की मी चुकून एअरपॉड गिळला होता. टैना बार्करने सांगितले की, मी माझे मित्र आणि इतर लोकांना या घटनेबद्दल सांगितले आहे. सर्वांनी मला एकच सल्ला दिला की, मी डॉक्टरकडे जाऊन दाखवावे. मला माहित नाही की असा प्रकार कधी कोणी केला असेल." बार्करने व्हिडीओमध्ये पुढे स्पष्ट केले की तिला या गोष्टीचा आनंद आहे की किमान तिचा उजवा एअरपॉड अजूनही तिच्या हातातच आहे.
बार्करने व्हिडीओमध्ये काय सांगितले?
टैना बार्कर सांगते की, मला या प्रकाराचा धक्का बसला आहे. ती म्हणते की माझ्यासोबत असे काहीतरी घडले, ज्यातून मी अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना विसरण्यासाठी मी माझ्या मित्रासोबत रोज मॉर्निंग वॉकला जाते. सध्या तिचं आयुष्य कसं बिझी आहे ते सांगत होती. आजकाल ती तिचं आयुष्य अशाप्रकारे जगत आहे.
इतर बातम्या
Viral Video : अचानक रस्त्यावर 'लाल पाण्याचा पूर', पण ही तर 'रेड वाईन नदी!' दृश्य पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का