Viral: आधी दिवाळी, नंतर छटपूजा, आता निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. अशात रेल्वेच्या सीट्स आधीच लोकांनी बुक करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे जर एखाद्याला ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी रिझर्वेशन मिळाले तर ते सामान्य माणसासाठी एखादं युद्ध जिंकण्यापेक्षा कमी नाही. असं बहुतेकदा घडतं जेव्हा निश्चित सीट मिळणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत लोकांना आरक्षित सीट शिवाय प्रवास करावा लागतो, तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दरम्यान, सोशल मीडिया यूजरने याच्याशी संबंधित एक पोस्ट शेअर केलीय. जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे या पोस्टमध्ये?
रेल्वेमध्ये टॉयलेटच्या दरवाजाजवळ झोपली महिला?
@Chaotic_mind99 नावाच्या X युजरने त्याच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय, ज्यात टॉयलेटच्या दरवाजाजवळ झोपलेल्या एका महिलेचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, ''धन्यवाद अश्विनी वैष्णवजी.. आज तुमच्यामुळे माझ्या पत्नीला ही जागतिक दर्जाची ट्रेन सुविधा मिळत आहे. मी सदैव तुमचा ऋणी राहीन''
पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिली पोस्ट
ही पोस्ट पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिली असून हजारो लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. रेल्वे सेवेनेही अनेक वेळा युजरला तिकिटाची माहिती विचारली, मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सोशल मीडियावर काही लोकांनी त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे.
नंतर कुणाला शिव्या देऊन काय उपयोग? नेटकऱ्यांच्या कमेंट्स
एका सोशल मीडिया यूजरने X वर लिहिले की पत्नीसाठी सीट बुक करण्यासाठी पैसे नाही? दुसऱ्याने लिहिले की भाऊ, लोक चार महिने अगोदर सीटची तिकिटे बुक करतात, तुम्हीही तसे करा. नंतर कुणाला शिव्या देऊन काय उपयोग?
''ही खरोखर तुमची पत्नी आहे की..."
दुसऱ्याने लिहिले, ही खरोखर तुमची पत्नी आहे की तुम्ही असे फोटो केवळ प्रचारासाठी शेअर केले आहेत? एकाने लिहिले की, एक निर्लज्ज माणूस आपल्या पत्नीला बसवून तिचा फोटो काढत आहे. एकाने लिहिले की ही फसवणूक आहे असे दिसते, कारण तीन वेळा रेल्वेने पीएनआर किंवा ट्रेन नंबरचे नाव विचारले आहे, परंतु ते प्रतिसाद देत नाही. याशिवाय त्याच्याकडे पत्नीचा कोणताही फोटो नाही. तो खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा>>
Viral: आई सर्वात मोठी योद्धा! लेकरासाठी एक 'आई' काय करू शकते, 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )