Viral Video : कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, तर कधी त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) पश्चिम बंगालचे (TMC)तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा (Madan Mitra) अनेकदा चर्चेत राहतात. गेल्या सप्टेंबरमध्ये भाजपच्या (BJP) एका मोहिमेदरम्यान गोंधळ निर्माण झाला होता आणि पोलिसांची वाहने जाळली होती. यावर टीएमसी नेते मदन मित्रा यांनी, 'क्रूड बॉम्ब फेकून हिंसाचार शांत केला असता', असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. याच मदन मित्रांनी सध्या तरी राजकारणासोबतच गायनाच्या क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. सध्या त्यांचा एक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या गाण्याने सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवून दिली आहे.


 






व्हिडीओ व्हायरल
20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 'FIFA World Cup 2022' सुरू होत आहे. हा मेगा इव्हेंट सुमारे महिनाभर चालणार असून, यामध्ये एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. आमदार मदन मित्रा यांचे नवे गाणेही या स्पर्धेवर आधारित असून, 'दे गोल दे गोल' असे शीर्षक आहे. हे गाणे स्वतः मदन मित्रा यांनी गायले आहे आणि बॉलीवूडच्या गाण्याप्रमाणेच हे गाणेही चित्रित करण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये मदन मित्रा हे एखाद्या अरब व्यक्तीप्रमाणे कपडे घालून रॅप गाताना दिसत आहे. याशिवाय गाण्यात ते अनेक प्रकारचे कपडे परिधान करताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे व्हिडीओमध्ये वर्ल्ड कपची प्रतिकृतीही दाखवण्यात आली असून, त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.


 


आमदाराचे हे धमाकेदार गाणे पाहिले?


त्यांचा हा अप्रतिम गाण्याचा व्हिडिओ स्वतः आमदार मदन मित्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. 16 नोव्हेंबरला शेअर केलेला हा व्हिडिओ एक मिनिट 21 सेकंदाचा आहे, जो आतापर्यंत 14 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. युजर्सना हे गाणं इतकं आवडलं आहे की ते कमेंटमध्ये 'दादा जिंदाबाद'च्या नारेही लावत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Satyendra Jain Viral Video : आपचे नेते सत्येंद्र जैन यांना तुरुंगात मसाज सुविधा? जेलमधील CCTV फुटेज समोर, व्हिडीओ व्हायरल