मुंबई: तुम्ही जर झोमॅटोवरुन (Zomato) फूड ऑर्डर करत असाल तर तर कंपनीचे सीईओ दिपेंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) हे स्वत: तुमच्या घरी डिलिव्हरी बॉय म्हणून येण्याची शक्यता आहे. कारण दिपेंदर गोयल हे तीन महिन्यातून किमान एक वेळ तरी फूड डिलिव्हरी करतात अशी माहित समोर आली आहे. विशेष म्हणजे डिलिव्हरी करायला गेलेल्या दिपेंदर गोयल यांना कोणीही ओळखत नाही. 


इन्फो एज या कंपनीचे व्हाईस चेअरमन संजीव बिकचंदानी (Sanjeev Bikhchandani) यांनी या संबंधित माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, आपण झोमॅटो (Zomato) टीमला आणि त्याच्या सीईओंना भेटलो. सीईओ दिपेंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) हे स्वत: कंपनीच्या टी शर्टमध्ये मोटरसायकलवरून फूड ऑर्डर डिलिव्हरी करतात. तीन महिन्यातून किमान एकदा तरी ते असं करतात आणि त्यांना कोणीही ओळखत नाही. 


 






संजीव बिकचंदानी (Sanjeev Bikhchandani Tweet) यांच्या या ट्वीटला उत्तर देताना झोमॅटोचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी म्हटलंय की, गेल्या तीन वर्षापासून आपण फूड डिलिव्हरी करतोय. 7 ऑक्टोबरला केलेल्या या ट्वीटला सुमारे दोन हजार लाईक्स आले आहेत, तर 138 रिट्वीट मिळाले आहेत. 


संजीव बिकचंदानी यांच्या या ट्वीटनंतर अनेकांच्या मनात उत्सुकता लागली आहे. झोमॅटोवर फूड डिलिव्हरी करताना डिलिव्हरी बॉयचे नाव दिपेंदर गोयल आहे का याची तपासणी अनेकांकडून केली जाते. तसेच त्यांच्या आणि दिपेंदर गोयल यांच्या ट्वीटवर अनेक मजेदार आणि भन्नाट कमेंट्सही केल्या जात आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :