Trending News : कामाच्या ठिकाणी असलेल्या पगाराबाबत अनेक कर्मचारी नाखूष असतात. व्यवस्थापनाने पगार वाढ करावी यासाठी कर्मचाऱ्यांकडून विविध पावले उचलली जातात. यात आंदोलने, संप पुकारला जातो. एका कर्मचाऱ्याने गांधीगिरी करत एका वेगळ्या पद्धतीने व्यवस्थापनाने लक्ष वेधलं आहे. कमी पगाराच्या निषेधार्थ एक कर्मचारी थेट ऑफिसमध्येच राहण्यास आला आहे. आपल्याला मिळणाऱ्या पगारात भाड्याच्या घरात राहता येणं अशक्य असल्याचे सांगत त्याने हे पाऊल उचललं आहे.
हे प्रकरण अमेरिकेतील आहे. टिकटॉकवर सिमोन नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ अपलोड करून या घटनेबाबत सांगितले आहे. व्हिडिओमध्ये सिमोन आपल्या आवश्यक असणाऱ्या वस्तूंसह आणि बिछाण्यासह ऑफिसच्या क्युबिकलमध्ये राहत असल्याचे दिसून आले.
सिमोनने सांगितले की, घरातील सर्व वस्तूंसह या ठिकाणी राहण्यास आलो आहोत. कमी पगारामुळे घरभाडे देखील भरता येत नसल्याचे त्याने सांगितले. सिमोनने सांगितले की, त्याचे बहुतांशी सहकारी घरातूनच काम करत असल्याने ऑफिस रिकामे असते. त्यामुळे इथं राहण्यासाठी पुरेशी जागा मिळाली असल्याचे त्याने सांगितले.
सिमोनने ऑफिसच्या केबिनचे रुपांतर घरात केल्याचे व्हिडिओत दिसून आले. त्याच्या केबिनमध्ये कपडे, बॅग, स्लीपिंग बॅग आदी वस्तू आढळून आल्या आहेत. आंघोळीसाठी तो ऑफिसच्या बाथरूमचा वापर करतो. ऑफिसच्या फ्रीजमध्ये खाद्य पदार्थ ठेवतो.
सिमोनचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने 3-4 दिवसांतच असे न करण्याबाबत सूचना केली. तर, कंपनीच्या एचआर विभागाने सोशल मीडियावरून हा व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले. टिकटॉकवर या व्हिडिओला 12 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Viral : कर्नाटकात मच्छिमारांनी पकडला 250 किलो दुर्मिळ मासा, क्रेनच्या मदतीने बाहेर काढला
- Trending : शार्क डोळे उघडे ठेवून झोपतात? शास्त्रज्ञांना मिळालं उत्तर
- Viral Video : बर्फाच्छादित डोंगरावर रंगला कबड्डीचा खेळ; ITBP जवानांचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha