Trending News : दैनंदिन जीवनात आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी पाहतो. यापैकी अनेक प्राण्यांबद्दल आपल्याला आश्चर्यकारक वाटत नाही. कारण हे प्राणी आपल्या आजूबाजूला दिसतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.   


दुर्मिळ प्रजातीचे प्राणी सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. आता मोराशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा मोर नेहमीसारखा साधा मोर नसून एक पांढरा शुभ्र मोर आहे.  ज्याला पाहून सगळेच थक्क झाले.


पाहा हा व्हिडीओ : 






सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मनोरंजक आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ दिसत आहेत. जे पाहून नेटकरी खुश होतात. नुकताच एका मोराचा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या मोराचा रंग पांढरा आहे. हा मोर त्याच्या रचनेमुळे सर्वांना मंत्रमुग्ध करताना दिसतो.


पांढऱ्या रंगाचा मोर दिसणे फारच दुर्मिळ आहे. सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 87 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याशिवाय लोक या व्हिडीओवर खूप आश्चर्य व्यक्त करत आहेत. पांढऱ्या रंगाचा मोर पहिल्यांदाच पाहिल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.


महत्वाच्या बातम्या :