Trending Brave Woman Video : राजस्थानमधील (Viral Video) श्रीगंगानगर भागात बँक लुटल्याची घटना समोर आली. काही दरोडेखोर मरुथरा बँकेत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घुसले पण त्यांना तिथे एक 'रिव्हॉल्व्हर राणी' भेटेल हे त्यांना कदाचित माहीत नव्हते. त्यांनी दरोडेखोरांना पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला. बँक मॅनेजरने एवढे शौर्य दाखवले की आता सगळेच तिच्या शहाणपणाचे आणि धाडसाचे कौतुक करत आहेत.
महिला बँक मॅनेजरने एवढे शौर्य दाखवले की..
हे चोरटे लोकांना चाकूचा धाक दाखवत होते पण बँक मॅनेजर पूनम गुप्ता यांना घाबरवू शकले नाहीत. पूनम गुप्ता यांनी सशस्त्र दरोडेखोराचा धैर्याने सामना केला. या गोंधळादरम्यान बँकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनीही चोरट्याला पकडून बाहेर काढले. हातात हातोडा घेऊन बँक व्यवस्थापकाने या सशस्त्र दरोडेखोराचा सामना केला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा दरोडेखोर पूनम गुप्ता यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हाच ती महिला त्याच्या हातावर हातोड्याने वार करते. या महिलेच्या धाडसासमोर शस्त्रधारी चोराचेही धीर सुटले आणि त्याला या महिलेचा सामना करता आला नाही. नंतर बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरोडेखोर पकडले गेले.
महिलेचे कौतुक
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स या महिलेचे कौतुक करत आहेत, तर बँकेत दरोडेखोर घुसल्याने अनेकजण बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
आरोपी ताब्यात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता घडली. हा दरोडेखोर बँकेत येऊन कर्मचाऱ्यांना सर्व पैसे बॅगेत भरण्यास सांगत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी बँकेत सुमारे 35 लाख रुपयांची रोकड जमा होती, ती या बँक महिलेच्या धाडसामुळे वाचली. श्रीगंगानगर येथील मीरा चौकी परिसरात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
इतर बातम्या
Viral Video : अमेरिकन मुलांना 'या' भारतीय शिक्षकाचं याड लागलं! गाण्याच्या माध्यमातून शिकवली गणिताची सूत्रे; व्हिडीओ पाहा