Trending News : भारताच्या स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष (Independence Day) पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत सरकारने ‘हर घर तिरंगा मोहीम’ही सुरू केली आहे. यावेळी देशबांधवांनी घरोघरी तिरंगा फडकवावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.


याच निमित्ताने आज चंदिगडमध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत तब्बल 7500 विद्यार्थ्यांनी एकत्र उभे राहून मानवी ध्वज बनवला. शहरातील सेक्टर-16 क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी सकाळी 10.30 वाजता नागरिकांनी एकत्रित येऊन राष्ट्रध्वज तिरंगा मानवी ध्वज साकारला आहे. 






मिळालेल्या माहितीनुसार, या खास कार्यक्रमात चंदिगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हवेत फडकणाऱ्या तिरंग्यासारखा आकार या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी स्टेडियम दुमदुमले होते. 


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे काय?


एखाद्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वे वर्ष पूर्ण होणार आहेत. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. याच निमित्ताने यावर्षी आपण अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. 


'हर घर तिरंगा' मोहीम


2022 मध्ये स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीत भारत युद्धपातळीवर गुंतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा अभियाना'मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा एक भाग आहे. या निमित्ताने लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रवृत्त करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.


महत्वाच्या बातम्या :