Indian Railways Books Cab: पावसाळ्यात रेल्वेमार्गावर दर दिवशीच काही ना काही कारणांमुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत असते. यासाठी रेल्वेकडून विविध कारणेही दिली जातात. या विविध कारणांमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. मात्र गुजरातमधील एका विद्यार्थ्याला ट्रेन बंद असताना महाविद्यालयात पोहचवण्यासाठी मदत केली आहे. रेल्वेच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना म्हणावी लागेल.
त्याचे झाले असे की, गुजरातमधील सत्यम गढवी नावाच्या विद्यार्थ्याने , एकता नगर (Ekta Nagar) ते वडोदरा (Vadodara) जाणारी ट्रेन बुक होती. मात्र पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचल्याने ऐनवेळी ट्रेन रद्द करण्यात आली. वडोदा वरून सुटणारी त्याची ट्रेन सुनिश्चित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना समजले त्यांनी तात्काळ एकता नगर ते वडोदरा यादरम्यान एक खाजगी कॅब बुक करून सत्यमच्या जाण्याची व्यवस्था केली. रेल्वेने केलेल्या या मदतीमुळे सत्यम आश्चर्यचकित झाला. सत्यमने त्याचा अनुभव सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.
सत्यम गढवी हा आयआयटी मद्रासचा विद्यार्थी आहे. कॉलेजला जाण्यासाठी मी एकता नगर ते वडोदरा ही ट्रेन बुक केली होती. परंतु पावसामुळे ट्रेन रद्द करण्यात आली. ट्रेन रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने त्याची मदत केली. त्यानंतर सत्यमने एक व्हिडीओ शेअर करत रेल्वे प्रशासनाचे आभार देखील मानवे.
सत्यम म्हणाला, आज रेल्वे प्रशासनामुळे मी वेळेत पोहचलो. यासाठी एकतानगर आणि वडोदरा रेल्वे प्रशासनाचा आभारी आहे. मी जी ट्रेन बुक केली होती, ती ट्रेन एकता नगरहून ९.१५ ला सुटणार होती. परंतु पावसामुळे ती ट्रेन ऐनवेळी रद्द करण्यात आली. ट्रेन रद्द झाल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी माझ्यासाठी एक खाजगी कॅब बुक केली. त्यामुळे मला माझी वडोदऱ्याहून पुढची ट्रेन वेळेत मिळाली. . रेल्वे कर्मचारी रेल्वेच्या प्रवाशांची प्रवाशांची काळजी घेतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या