Trending News : असं म्हटलं जातं की, कष्टा केल्यानंतर फळ हे नेहमी मिळतेच. जर प्रामाणिकपणे कष्ट केले तर अशक्य असलेले काम देखील शक्य होते, असा विचार काही लोक करतात. काही लोक आयुष्यात अपयशी झाल्यानंतर नशिबाला दोष देतात पण काही लोक नशिबाला दोष न देता प्रामाणिकपणे कष्ट करतात. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर (Social Media) त्याची अशीच प्रेरणादायी स्टोरी लोकांसोबत शेअर केली आहे. 


डिलेव्हरी बॉयचे काम करणाऱ्या शेख अब्दुल सथरला एका कंपनीमध्ये  सॉफ्टवेअर इंजीनिअरची नोकरी मिळाली आहे. त्याच्या या सक्सेस स्टोरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. शेख अब्दुल सथरनं सोशल मीडियावर त्याची सक्सेस स्टोरी सांगितली आहे. अब्दुलनं त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवरुन पोस्ट शेअर करुन त्याचा डिलेव्हरी बॉय ते सॉफ्टवेअर इंजीनिअर हा प्रवास लोकांसमोर मांडला आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, मी एक असा डिलेव्हर बॉय आहे जो स्वप्न पाहतो. मला माझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचा होता.  कारण माझे वडील कंत्राटी कामगार आहेत. त्यामुळे आमच्याकडे फक्त जगण्यापुरते पैसे होते. मी सुरुवातीला खूप लाजाळू होतो, पण डिलिव्हरी बॉय झाल्यानं मला खूप काही शिकायला मिळाले.'




पुढे  शेख अब्दुल सथरनं पोस्टमध्ये लिहिले, 'आचानक एका मित्रानं मला कोडिंग शिकण्याचा सल्ला दिला. मला माझ्या मित्रानं एका कोर्सबाबत माहिती सांगितली. मी हा कोर्स करावा अशी त्याची इच्छा होती. मी त्यानं दिलेला सल्ला ऐकला आणि कोडींग शिकायला सुरूवात केली.  संध्याकाळी 6:00 ते 12:00 वाजेपर्यंत मी डिलिव्हरी बॉयचे काम केले आणि बाकीचा वेळ मी कोडींग शिकण्यात घालवत होतो.  त्याच्याकडून मिळालेले पैसे मी पॉकेट-मनी म्हणून आणि माझ्या कुटुंबाच्या छोट्या गरजांसाठी वापरत असे. काही दिवसांमध्येच मी स्वतः वेब अॅप्लिकेशन तयार करायला सुरूवात केली. मी काही प्रकल्प केले आणि कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला."  नोकरीसाठी त्याचे नंतर सिलेक्शन झाले, असंही या पोस्टमध्ये  शेख अब्दुल सथरनं सांगितलं. 


 शेख अब्दुल सथरच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. अनेक युझर्सनं त्याच्या पोस्टला कमेंट करुन त्याला शुभेच्छा दिल्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या