Indian Railways : भारतात रेल्वेचं मोठं जाळं पसरलेलं आहे. देशात 68,043 हजार किलोमीटर लांबीचं रेल्वेचं जाळ आहे. भारतात 7000 हून अधिक रेल्वे स्थानकं (Railway Station) आहेत. सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात सुमारे 13,000 हून अधिक प्रवासी ट्रेन आणि त्या व्यतिरिक्त इतर मालगाड्यांची संख्या आहे. भारतात रेल्वेची सुरुवात ब्रिटीश राजवटीत म्हणजेच इंग्रजांच्या काळात झाली होती. इंग्रजांच्या काळात देशाती काही रेल्वे स्थानकं तयार करण्यात आली होती, जी आजही भारताची शान आहेत. ही रेल्वे स्थानकं कोणती जाणून घ्या.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस


मुंबई येथील असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतातील मुख्य रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही याचा समावेश आहे आणि त्याचे बांधकाम 1878 मध्ये जुन्या बोरी बंदर रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस सुरू झाले. या स्थानकाचं बांधकाम 1887 मध्ये पूर्ण झालं. या स्थानकाला नाव राणी व्हिक्टोरियाचं नाव देण्यात आलं. त्यावरून व्हिक्टोरिया टर्मिनस असं नाव ठेवण्यात आलं होत. मात्र, 1996 मध्ये त्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आलं. आता याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं आहे.


हावडा रेल्वे स्टेशन


हावडा रेल्वे स्थानक हे पश्चिम बंगालमधील हावडा शहरातील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हावडा रेल्वे स्थानकावरून पहिली ट्रेन 15 ऑगस्ट 1854 रोजी धावली, जी हावडा-हुबळी मार्गावर होती. हे रेल्वे स्थानक भारतातील सर्वात व्यस्त स्थानक असून यामधअये 23 प्लॅटफॉर्म आहेत.


डेहराडून रेल्वे स्टेशन


डेहराडून रेल्वे स्थानक हे उत्तराखंडचे प्राथमिक रेल्वे स्थानक आहे, जे ब्रिटिशांनी 1897 ते 1899 दरम्यान बांधलं गेलं होतं. या रेल्वेमार्गाला 1896 मध्येच मंजुरी मिळाली होती. पण, त्यानंतर बांधकाम थोड्या उशिराने सुरु झालं होतं. 1 मार्च 1900 रोजी या रेल्वे मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.


रोयापुरम रेल्वे स्टेशन


चेन्नई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या वलजापेट विभागावरील रोयापुरम रेल्वे स्थानक इंग्रजांच्या काळातील आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या याच रेल्वे स्थानकावरून 1856 मध्ये दक्षिण भारतातील पहिली ट्रेन रवाना झाली होती. 


पंडित दील दयाल उपाध्यायन रेल्वे स्टेशन


पंडित दील दयाल उपाध्यायन रेल्वे स्थानक हे उत्तर प्रदेशचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्थानक पूर्वी मुगलसराय रेल्वे स्थानक म्हणून ओळखलं जात होतं, पण नंतर त्याचं नाव बदलण्यात आले. हे बनारसपासून फक्त चार मैल अंतरावर आहे. हे स्टेशन 1862 मध्ये बांधले गेलं होतं, तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने हावडा आणि दिल्ली दरम्यान रेल्वे मार्ग सुरू केला.


लखनौ चारबाग रेल्वे स्टेशन


लखनौच्या पाच रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या चारबाग रेल्वे स्थानक महत्त्वाचं आहे. चारबाग रेल्वे स्थानकाचं काम 1914 मध्ये सुरु झालं आणि 1923 मध्ये पूर्ण झालं. या रेल्वे स्थानकाची रचना ब्रिटिश वास्तुविशारद जे. एच. यांनी केली होती. या बांधकामादरम्यान भारतीय अभियंता चौबे मुक्ता प्रसाद यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी हे रेल्वे स्टेशन बांधण्यासाठी 70 लाख रुपये खर्च आला होता. स्थानकासमोर एक मोठं उद्यान आहे आणि स्थानकातच राजपूत, अवधी आणि मुघल स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून येतो.


नवी दिल्ली रेल्वे स्टेशन


अजमेरी गेट आणि पहाडगंज दरम्यानच्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला ईस्ट इंडिया कंपनीने 1926 मध्ये मान्यता दिली होती. यानंतर, स्टेशनचे बांधकाम सुरू झाले आणि 1931 मध्ये त्याचं उद्घाटन झालं. उद्घाटनावेळी व्हाईसरॉय या स्थानकातून नवी दिल्लीत दाखल झाले. सध्या, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात 16 प्लॅटफॉर्म आहेत.


नंदी हॉल्ट रेल्वे स्टेशन


बंगलोर येथील नंदी हॉल्ट रेल्वे स्थानक यलुवाहल्ली हे रेल्वे स्थानकही इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं आहे. या रेल्वे स्थानकाचा इतिहास सुमारे 108 वर्षे जुना असल्याचं मानलं जातं. हे रेल्वे स्थानक स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलं होतं.