Maharaja Express Train: भारतामधील सर्वात महागड्या ट्रेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत व्यक्ती ट्रेनमधील वर्ल्ड क्लास लग्जरी सोई सुविधांबाबत (Luxurious Facility) सांगत आहे. हा व्हिडीओ महाराजा ट्रेन (Maharaja Express Train) मधील सर्वात महागड्या बोगीचा आहे. यामधील तिकीट ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. महाराजा ट्रेन जसं नाव आहे, तसेच यामध्ये सुविधा दिल्या जातात..
महाराजा एक्स्प्रेस (Maharaja Express Train) ट्रेनला इंडियन रेलवे टूरिज्म कॉरपोरेशनद्वारे चालवण्यात येते. ही ट्रेन देशातील वेगवेगळ्या चार मार्गावर चालते. या चारमधील कोणत्याही एका मार्गाची तुम्ही निवड करु शकता. सात दिवसांचा प्रवास असेल, यादरम्यान तुम्ही लग्जरी ट्रेन आणि सोई सुविधांचा अस्वाद घेऊ शकता.
एका तिकिटी किंमत वीस लाख रुपये -
महाराजा ट्रेनच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, या ट्रेनच्या प्रत्येक बोगीला मोठ मोठ्या खिडक्या आहेत. त्याशिवाय कॉम्प्लिमेंट्री मीनी बार, एअर कंडिशिनिंग, वायफाय, लाइव टीवी, डीवीडी प्लेअर यासह अनेक लग्जरी सोई सुविधा देण्यात आल्या आहेत. महाराजा एक्स्प्रेसचं तिकीट पाच लाख रुपयांपासून 20 लाख रुपयांपर्यंतचं आहे. महाराजा एक्स्प्रेस देशभरात पाच कॅटेगरीमध्ये प्रवास करते. यात हेरिटेज ऑफ इंडिया, ट्रेजरर्स ऑफ इंडिया, जेम्स ऑफ इंडिया, द इंडियन पॅनोरमा आणि इंडियन स्प्लेंडर टूर यांचा समावेश आहे.
कोणत्या प्रकारच्या बोगी -
महाराजा एक्स्प्रेसमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या बोगी आहेत. त्यामध्ये डिलक्स केबिन, सुइट, जूनियर सुइट आणि प्रेसिडेंशिअल सुइट यांचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी दोन प्रकारचे पॅकेज देण्यात आले आहेत. तीन रात्र आणि चार दिवस आणि दुसरा पॅकेज सहा रात्र आणि सात दिवस.. या दोन पॅकेजद्वारे या ट्रेनमधून प्रवास करता येईल. या एक्स्प्रेसच्या केबीनला रत्नांच्या नावावरून नावे देण्यात आलेली आहेत. त्यात मोती, हीरा, नीलम, फीरोजा, मुंगा आणि पुखराज यांचा समावेश आहे.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
ट्रेनची वैशिष्ट्ये काय?
- महाराजा एक्स्प्रेस ही जगातील प्रमुख लक्झरी रेल्वेंपैकी एक आहे.
- प्रवाशांसाठी महाराजा एक्स्प्रेसमध्ये 14 केबीन आहेत.
- त्यात 5 डीलक्स बोगी, 6 ज्युनियर सुईट, 2 सुईट आणि एक मॅजेस्टिक प्रेसिडेंशियल सुईट आहे.
- महाराजा एक्सप्रेसमध्ये मयूर महल आणि रंग महल नावाचे दोन रेस्तरॉ आहेत तसेच बारही आहे.
- त्याशिवाय प्रत्येक केबीन आणि सुईटमध्ये फोनपासून इंटरनेटसह इतर सुविधा आहेत.