Space Farming: जगभरातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे, खाणारी तोंडं वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे खाद्य उत्पादनात मात्र त्या प्रमाणात वाढ होत नाही. त्यामुळे पृथ्वीवरील जमीन आता कमी पडू लागल्याचं चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून आता अंतराळात शेती करता येते का याची चाचपणी केली जात आहे. चीन आणि अमेरिकेने यामध्ये पुढाकार घेतला आहे आणि नवनवीन प्रयोग करण्याचा सपाटा लावला आहे.
अलीकडेच कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठाचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, जगभरातील शेतजमीनचे क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कदाचित जगातले काही मोठे देश अंतराळात शेती करण्यासाठी पाऊल उचलत असल्याचं चित्र पाहायला पाहायला मिळत आहे. आज जगातल्या अशा पिकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी अंतराळात (Space Farming) ज्यांना अंतराळात उगवले जात आहे.
अंतराळात पीक कसं उगवतं?
अंतराळातील वातावरणात आणि पृथ्वीवरील वातावरणात जमीन आस्मानाचा फरक आहे. परंतु तरीही अंतराळात शेतीचा प्रयोग केला जात आहे. खरंतर अंतराळात पाठवलेले पिकांचे बीज सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात राहतात आणि तेथे त्यांना मोठ्या प्रमाणावर कॉस्मिक किरणांचा सामना करावा लागतो. ही प्रक्रिया पिकांच्या विकासाची आणि परिवर्तनाची क्रिया वेगवान करण्यास मदत करतात. या प्रक्रियेला स्पेस म्युट्येजेनेसिस म्हटले जाते. त्यामुळे अंतराळातील पीकं कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास तयार होतात.
चीन करतोय अंतराळात शेती
चीन अंतराळात अनेक प्रकारची पिके घेत आहेत. यामध्ये लुयुआन 502 या गव्हाच्या प्रजातीचा देखील समावेश आहे. ही गव्हाची बिजे अंतराळातून आणून चीनच्या धरतीवर त्या पिकांचे उत्पादन घेणार आहे. याचप्रमाणे चीनचे शास्त्रज्ञ अंतराळात भात, मका, सोयाबिन, तीळ, कापूस, टरबूज यासारख्या अनेक पिकांची देखील शेती अंतराळात करत आहे.
अमेरिकेने देखील घेतले अंतराळात पीक
चीनच्या तुलनेत अमेरिका अंतराळात प्रयोग करण्यात अग्रगण्य राहिला आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा देखील अंतराळात शेती करत आहे. नासाने त्यांच्या अंतराळातील शेतीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हि़डीओला सोशल मिडियावर बरीच पसंती मिळाली होती. यामध्ये मुळ्याचे पीक 27 दिवसांत तयार झाल्याचं दिसून आलं आणि त्याचा रंग सर्वसाधारण मुळ्यापेक्षा थोडासा वेगळा होता. तसेच नासाने याआधी अंतराळात गहू आणि अनेक प्रकारच्या पिकांची शेती केली होती.
चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतदेखील अंतराळात शेती करणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच आता अंतराळातील ही पीकं कशी असणार याची उत्सुकता चीनसह जगभरातील लोकांना लागली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या ;