मुंबई : विमानात (Flight) लोकांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Post) झाल्याचं पाहायला मिळालं आहे. इतकंच नाही तर विमानात बऱ्याचदा अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामुळे गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क तंबाखू मळताना दिसत आहे. इतकच नव्हे तर या व्यक्तीने तंबाखू मळल्यानंतर विमानतच तंबाखू खाल्ली देखील. चालत्या ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये तंबाखू खातानाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण आता थेट विमानतच तंबाखू मळताना पाहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत या व्हिडीओला खूप पसंती मिळाली आहे. तसेच, नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स देखील यावर केल्या आहेत. 







देसी स्टाईलमध्ये काम करणाऱ्या लोकांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तंबाखू खाणारी व्यक्ती कुठेही मळायला सुरुवात करते असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर अनेकदा वृद्ध व्यक्ती तंबाखू मळतानाचे रिल देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. विमानात बसून एक वृद्ध व्यक्ती तंबाखू मळताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या विमानात अनेक प्रवासी असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 


युजर्सच्या मजेशीर कमेंट्स


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी अनेक मजेशीर कमेंट्स यावर केल्या आहेत. यावर एका युजर्सने लिहिले आहे की, "खिडकीच्या कोपऱ्यात थुंका', तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'यांना हातात सोन्याची वाटी दिली तरी हे लोक भिकचं मागणार." तर एका युजर्सने लिहिलं आहे की, "आम्हालाही थोडं द्या." या व्हिडीओला सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 


पण यामध्ये विमान प्रशासनावरही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विमानात अशा गोष्टी खाण्यास परवानगी कशी दिली जाते असा प्रश्न देखील सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विमान प्रशासनाने या व्यक्तीवर काही कारवाई केली का याची विचारणा देखील काही लोकांनी केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Viral Post : शाब्बास पोरी! गणिताच्या पेपरात कमी गुण तरीही आईला लेकीचं कौतुक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल