Snowfall in Kashmir: भारत (India) हा एक असा देश आहे जिथे थंडी (Winter), गरमी (Summer) आणि पाऊस (Monsoon) तीनही सीझन पाहायला मिळतात. जगात काही असे देश आहेत जिथे फक्त थंडी असते किंवा फक्त उष्णता असते. भारतात मात्र दसऱ्यासोबत (Dasara) थंडीला सुरुवात होते. दिवाळीपासूनच (Diwali) लोक उबदार कपडे घालण्यास सुरुवात करतात. 


दिल्लीपासून बिहार (Bihar), उत्तर प्रदेशपर्यंत (Uttar Pradesh) आणि हिमाचलपासून काश्मीरपर्यंत सगळीकडे थंडीचं वातावरण पाहायला मिळतं. काही ठिकाणी बर्फवृष्टी होते, तर काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीमुळे लोकांना गारठा भरतो. अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, जर काश्मीर किंवा हिमाचलमध्ये बर्फ पडत असेल तर त्याचा परिणाम दिल्लीत अधिक का दिसून येतो? याचं कारण आज पाहूया.


या कारणामुळे दिल्लीत आहे अधिक थंडी


दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्ली (Delhi) ही उत्तराखंड (Uttarakhand), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि काश्मीरपासून (Kashmir) सर्वात जवळ आहे. या राज्यांचा प्रवास इतर कोणत्याही राज्यांपेक्षा दिल्लीतून सर्वात जवळचा आहे. दिल्ली शहर काश्मीर आणि हिमाचल प्रदेशपासून जवळ आहे. या राज्यांमध्ये पर्वत आहेत, जिथे सर्वात जास्त बर्फ पडतो. जेव्हा बर्फ पडतो आणि नंतर वारे वाहतात, तेव्हा त्या वाऱ्यामध्ये ओलावा असतो, त्यामुळे थंडी वाढते.


तुमच्या शहरात पाऊस पडला आणि थोडा वारा सुटला की थोडीशी थंडी जाणवू लागते, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. तर हवेतील आर्द्रतेमुळे ही थंडी दिसून येते. उन्हाळ्यात असं घडत नाही. पण केवळ हिवाळ्यातच वारे वाहतात असंही होत नाही, परंतु पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे याचा परिणाम दिसून येतो.


दिसू लागला थंडीचा परिणाम


जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या जवळ गेलं आहे. त्याचा प्रभाव सध्या दिल्ली एनसीआरमध्येही दिसून येत आहे. जेव्हा लोक बाहेर पडतात तेव्हा त्यांना थंडी जाणवते. तुम्हीही दिल्ली किंवा आसपासच्या परिसरात राहत असाल तर तुम्हालाही असंच वाटत असेल. 24 ऑक्टोबरला दसरा आहे, त्याआधीच हवामानाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. येत्या महिनाभरात थंडीचा पारा अजून वाढणार आहे, यासाठी दिल्लीकर आतापासूनच सज्ज झाले आहेत.


हेही वाचा:


Trending: दारू ढोसायचा, पोटभर खायचा; बिल देताना मात्र आजारपणाचं नाटक, मग एकदाच पोलखोल झाली अन्...