Coronavirus Cases Today in India : भारतात कोरोनाचा संसर्गात मोठी घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 913 नवे कोरोनाबाधित आढळले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1096 नवीन रुग्ण आणि 81 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 21 कोटा 358 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.


सक्रिय रुग्णांची संख्या 12,597 वर पोहोचली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात देशात 1 हजार 316 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 597 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख हजार 821 झाली आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 13 हजारांच्या खाली पोहोचली आहे. सध्या देशात 12,597 रुग्ण उपचाराधील आहेत. 18 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदा भारतात 1,000 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी 18 एप्रिल 2020 रोजी 991 रुग्णांची नोंद झाली होती.


रुग्णांच्या संख्येत 416 रुग्णांची घट


गेल्या 24 तासात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 416 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. केद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाच्या संसर्गाचा दैनंदिन दर 0.29 टक्के झाला असून साप्ताहिक संसर्ग दर 0.22 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 21 हजार 358 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.





 


आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधित मृत्यू


देशात आतापर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 47 हजार 789, केरळमध्ये 68 हजार 74, कर्नाटकात 40 हजार 54, तामिळनाडूमध्ये 38 हजार 25, दिल्लीत 26 हजार 153, उत्तर प्रदेशात 23 हजार 496 आणि पश्चिम बंगालमध्ये 21 हजार 199 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारही होते. 19 डिसेंबर 2020 रोजी देशात कोरोना रुग्णांची संख्या एक कोटीच्या पुढे गेली होती. गेल्या वर्षी, 4 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष पार केली होती.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha