Trending News: सर्पदंशामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे आपण नेहमीच ऐकत आलोय, पण एका शेतकऱ्याला साप चावून सापच मरण पावल्याची अजब घटना समोर येतेय. (Snake bite) पंजाबमधील फाल्जीका जिल्ह्यातील ही घटना आहे. मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाने सापाला चावल्याच्या घटनेनंतर घडलेली ही दुसरी घटना आहे.
सध्या पावसाळ्यात शेतात, जंगलाच्या जवळच्या परिसरात किंवा अडगळीच्या ठिकाणी साप आल्याचं पाहायला मिळतं. या काळात सर्पदंशाच्या अनेक घटनाही ऐकायला मिळतात. सध्या सर्पदंशाची एक घटना चर्चेत आहे.
पेरणी करताना सापाने घेतला शेतकऱ्याच्या पायाचा चावा
एक शेतकरी आपल्या शेतात पेरणी करत असताना अचानक त्याच्या पायाखाली साप आला. सापाने शेतकऱ्याच्या पायाचा जोरदार चावा घेतला. शेतकऱ्याला काही वेळ अस्वस्थ वाटू लागले. पण तो पुढे चालू लागला तर सापाचा मृत्यू झाल्याचे कळले.
सापाने घेतला चावा अन् सापाचाच मृत्यू!
या घटनेनंतर शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी समृद्ध सापाला बाटलीत टाकून शेतकऱ्याला अबोहरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. आता या रुग्णालयात या शेतकऱ्याचे उपचार सुरू आहेत. पंजाबमधील फाल्जीका जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून ही घटना समोर आली आहे. सापाने चावा घेतल्यानंतर त्याचाच मृत्यू झाल्याने गावकरीही अचंबित झाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक हैराण करणारी घटना बिहारमध्ये अशीच घडली होती. सापाने दंश केल्यावर त्याचा हिशेब चुकता करण्यासाठी त्या तरुणाने ही सापाचा चावा घेतला. विशेष म्हणजे यामुळे सापाचा मृत्यू झाला,आणि तरुणाची तब्येत अगदी ठणठणीत असल्याचे घटना घडली. या घटनेनंतर तरुणाला दवाखान्यातही दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तो पूर्णपणे निरोगी आणि धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले.
साप चावला म्हणून पठ्ठ्या सापालाच चावला
बिहारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला साप चावला. यानंतर हा व्यक्ती तीन वेळा सापाला चावला, त्यामुळे सापाचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या तरुणाने सांगितलं की, माझ्या गावात सर्पदंशावर गावकरी हीच युक्ती करतात, त्यानेही तेच केलं.
बिहारमधील नवादा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगली भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा सर्व कामगार त्यांच्या बेस कॅम्पमध्ये झोपलं होते. यावेळी संतोष लोहार नावाच्या मजुराला विषारी साप चावला. यानंतर संतप्त झालेल्या संतोषने लोखंडी रॉडच्या साहाय्याने सापाला पकडलं आणि सापाला तीन वेळा चावा घेतला, यामुळे साप मरण पावला.
हेही वाचा: