Sleeping School Teacher Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता शाळेतील शिक्षिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे ही शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवताना नाही, तर शाळेच्या वेळेत झोपलेली दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षिका शाळेच्या वेळेत वर्गात चटई पसरुन झोपलेली दिसत आहे. इतकंच नाही तर, या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याने हवा घालायला लावली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे.


चटई टाकून शिक्षिका वर्गातच झोपली


उत्तर प्रदेशातील प्राथमिक शाळांमधील सरकारी शिक्षक मुलांना कसं शिकवतात आणि त्यांचं भविष्य घडवत आहेत, याचं उदाहरण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अलीगडमधील एका प्राथमिक शाळेतील हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये शासकीय शिक्षक शाळेच्या वेळेत वर्गात झोपून राहिल्याचं दिसत आहे आणि वीज नसताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याने हवा घालायला लावली.


चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याने वारा घालायला लावला


हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, महिला शिक्षिका शाळेतील वर्गात चटईवर झोपली आहे आणि शाळेच्या गणवेशात असलेले चिमुकले विद्यार्थी शिक्षिकेला हातपंख्याने हवा घालत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अलीगढ जिल्ह्यातील धानीपूर ब्लॉकमधील असल्याचं समोर आलं आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ






स्लिपिंग टीचरचा व्हिडीओ व्हायरल


व्हायरल झालेला व्हिडीओ अलीगढ जिल्ह्यातील धानीपूर ब्लॉक अंतर्गत गोकुळ गावात असलेल्या प्राथमिक शाळेचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला शिक्षिका जमिनीवर पसरलेल्या चटईवर शांतपणे झोपली आहे आणि शाळेच्या गणवेशातील दोन मुली तिला पंखा देत आहेत.


शिक्षिका कोण याची ओळख पटली


या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच शिक्षिकेचा  आणखी एक जुना व्हिडीओही चर्चेत आला आहे. जुन्या व्हिडीओमध्ये शिक्षक एका मुलाला काठीने मारहाण करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ एक वर्ष जुना आहे. तपास विभागाचे शिक्षणाधिकारी राम शंकर कुरील यांनी दोन्ही व्हिडीओ एकाच शिक्षिकेचा असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे दोन्ही व्हिडीओ मुख्याध्यापिका डिंपल बन्सल यांचे असल्याचं समोर आलं आहे.


मुख्याध्यापिकेचं निलंबन


याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेशकुमार सिंह यांनी कारवाई केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका डिंपल बन्सल यांना शिक्षकांच्या नियमांचे उल्लंघन करणे, मुलांना मारहाण करणे आणि इतर बाबींसाठी तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासमोरच जया बच्चन आणि रेखानं मारली मिठी, अवॉर्ड शोमधील व्हिडीओ व्हायरल