LGBT: समलैंगिक विवाहाला (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्र सरकारवर विश्वास नसल्यामुळे कोर्टात समलैंगिक विवाहासाठी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने निकाल आल्यानंतर सर्वत्र समलैंगिक विवाहाबद्दल चर्चा सुरू आहे. याआधीही तुम्ही LGBTQIA समाजाबद्दल ऐकलं असेल.पण तुम्हाला LGBTQIA काय आहे हा माहीत आहे का? यातील L,G,B,T,Q,I,A अर्थ तुम्हाला माहीत आहे का? विविध लोकांना संबोधित करण्यासाठी यातील अक्षरांचा वापर केला जातो.
काय आहे LGBTQIA?
LGBTQIA हा समलैंगिक वर्गासाठी वापरला जाणारा एक प्रकारचा शब्द आहे, जो समलिंगी समुदायाबद्दल सांगतो. यातील प्रत्येक वर्णमाला एक श्रेणी दर्शवते. जसे L म्हणजे लेस्बियन आणि G म्हणजे गे. याशिवाय त्यात BTQIA इत्यादी अक्षर एका विशिष्य समुदायाबदद्ल सांगते. समलिंगी समुदायात 72 कॅटेगरी असले तरी, याला दर्शवण्यासाठी साधारणपणे LGBTQIA+ वापरला जातो. याचा अर्थ जाणून घेऊया.
काय आहे LGBTQIA चा फुल फॉर्म
L- L म्हणजे लेस्बियन. या वर्गात अशा महिलांचा समावेश होतो, ज्यांचं केवळ महिलांकडेच आकर्षण असतं.
G- G म्हणजे गे. या वर्गात अशा पुरुषांचा समावेश होतो जे केवळ पुरुषांकडे आकर्षित होतात.
B- B म्हणजे बायसेक्सुअल. या वर्गात अशा लोकांचा समावेश होतो, जे स्त्री आणि पुरुष दोघांकडेही लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतात.
T- T म्हणजे ट्रान्सजेंडर. यामध्ये अशा लोकांचा समावेश आहे जे कोणत्याही लिंगाद्वारे परिभाषित केलेले नाहीत. या श्रेणीतील लोक जन्मतः असे असतात.
Q- Q चा अर्थ क्वीअर आहे. ज्यांना स्वतःची ओळख पटू शकलेली नाही अशा लोकांचा यात समावेश आहे. असे लोक अजूनही त्यांच्या शारीरिक इच्छा ठरवू शकत नाहीत.
I-I म्हणजे इंटरसेक्स. हे असे लोक आहेत ज्यांना अनुवांशिक समस्यांमुळे पुरुष किंवा स्त्री म्हणून परिभाषित केलं जाऊ शकत नाही.
A- A म्हणजे एसेक्सुअल किंवा अलैंगिक. हे असे लोक आहेत ज्यांना लैंगिक आकर्षण कमी आहे आणि ते रोमँटिक नाहीत.
समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा नाहीच
समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. 11 मे रोजी न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण केली. याचिकाकर्त्यांनी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, असा आग्रह धरला होता. तर केंद्र सरकारने समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता न्यायालयाने निकाल देत समलिंगींच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणं फेटाळलं आहे.
हेही वाचा: