Salary Origin Story:  'खुश है जमाना आज पहली तारीख है...' या गाण्यातून प्रत्येक नोकरी करणाऱ्या प्रत्येत व्यक्तीला हे गाणे आपल्या जवळचे वाटते. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या  आयुष्यात एक तारखेला विशेष महत्त्व असते. नोकरदार   सगळेच या 1  तारखेची आतुरतेनं वाट पाहत असतो. कधी एकदा पगार (Salary)  होईल, याकडे आपले डोळे लागलेले असतात. म्हणूनच, हल्ली 'Salary is credited' हा  मॅजिक मेसेज समजला जातो. परंतु जगातील सर्वात आवडीचा असणारा हा शब्द आपण दैनंदिन आयुष्यात वापरणाऱ्या मीठावरुन पडला हे जर म्हटले नक्कीच नवल वाटेल. आज आम्ही तुम्हला मीठावरून (Salt) सॅलरी शब्द कसा आला याची पूर्ण कहाणी  सांगणार आहे.


प्राचीन रोममध्ये दैनंदिन व्यवहारात पैशांऐवजी मीठाचा वापर केला जात असे. त्यावेळी जे सैनिक रोमन साम्राज्यासाठी काम करत होते त्यांना रोजगार म्हणून पैशांऐवजी मीठ दिले जात होते.  त्यावरुनच कदाचीक 'खाल्ल्या मिठाला जागणे' अशी म्हण आली असेल.  


कसे पडले सॅलरी नाव?


इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार रोमन इतिहासकर प्लीनी द एल्डर यांनी आपल्या नॅचरल हिस्ट्री पुस्तकात लिहल्याप्रमाणे रोममध्ये पूर्वी सैनिकांना रोजगार म्हणून मीठ दिले जात होते. त्यावरून सॅलरी हा शब्द उदयाला आला आहे. Salt हा शब्द Salary वरून आला आहे. अनेक रिपोर्टनुसार  Soldier हा लॅटिन शब्द sal dare’ या शब्दावरून बनला आहे. ज्याचा अर्थ मीठ देणे असा होतो. रोमनमध्ये मीठाला सॅलेरियम म्हटले जाते. त्यावरूनच सॅलरी शब्द पडला आहे.


पगार म्हणून मिळत होते मीठ 


फ्रान्सचे इतिहासकारांच्या मते पहिली सॅलरी 10,000 इ. स. पूर्व आणि 6000 इ.स. पूर्वच्या दरम्यान झाली आहे. प्राचीन रोममध्ये लोकांना काम केल्याच्या बदल्यात पैशांऐवजी मीठ दिले जात असे. त्यावेळी रोमन साम्राज्यातील सैनिकांना नोकरी केल्याद्दल एक मूठभर मीठ दिले जाते होते. त्यावेळी मीठाचा व्यापार केला जात होता. त्याअगोदर पगार दिला जात होता याविषयी कोणतीही माहिती मिळत नाही.


मीठ इमानदारीचे प्रतीक


हिब्रू पुस्तक एजारामध्ये 550 आणि 450 इ.स. पूर्वचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये लिहिले आहे ती, जर तुम्ही  एखाद्या व्यक्तीकडून मीठ घेत असाल तर ते महिन्याचा पगार घेण्यासारखे आहे. त्यावेळी मीठ खूप दुर्मीळ मानले जात असे . पूर्वीच्या काळात मीठावर फक्त त्यांचा हक्क होता जे राज्य करत होते. या पुस्तकात एका मशहूर फारसी राजा आर्टाजर्क्सीस उल्लेख केला आहे. त्या राजाचे शिपाई आपल्या इमानदरीविषयी सांगताना म्हणायचे की, आम्हाला राजाकडून आम्हाला मीठ मिळते. याचा अर्थ ते आपल्या राजाबरोबर इमानदार होते.  


हे ही वाचा :


 हिमाचलचे 'हे' ठिकाण भटक्यांसाठी आहे नंदनवन, सौंदर्य पाहून व्हाल थक्क