मुंबई : पुणे शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरणी येरवाडा पोलीस (Police) स्टेशनमधील दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणात अल्पवयीन कारचालक मुलास 14 दिवसांसाठी बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तर, आरोपी विशाल अग्रवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. पुणे अपघातप्रकरणाशी (Accident) संबंधित हा व्हिडिओ होता. ज्यामध्ये, एक तरुण मुलगा रॅपसाँग म्हणत असून संपूर्ण पुणे अपघाताच्या घटनेवर भाष्य करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर, हा मुलगा म्हणजे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलगा असल्याचे समजून व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. मात्र, आता रॅपसाँग करणाऱ्या मुलानेच त्या व्हिडिओबाबतची माहिती दिली आहे. तसेच, मी फेमस झाल्याचंही त्याने म्हटलं आहे.  


विशाल अग्रवाल यांच्या पत्नीने व्हायरल व्हिडिओ हा माझ्या मुलाचा नसल्याचे म्हटले. माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे, त्याने कुठलाही व्हिडिओ बनवला नाही, असेही त्यांनी सांगितले होते. तर, पुणे पोलिसांनीही आज पत्रकार परिषद घेऊन तो व्हिडिओ कार दुर्घटनेतील मुलाचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर, आता स्वत: त्या मुलानेही याबाबतची कबुली दिली आहे. माझं नाव आर्यन निखरा असून मी दिल्लीतील रहिवाशी आहे, मी 22 वर्षांचा असून कंटेंट क्रिएटर असल्याचं त्याने सांगितले.


आम्ही सोशल मीडियासाठी कंटेंट बनवत असतो, मौजमस्ती सुरू असते. पुण्यातील अपघाताची घटना घडली, मग आम्हाला कंटेट बनवण्यासाठी संधी मिळाली. त्यातूनच मी हा व्हिडिओ बनवल्याचं आर्यनने म्हटले. मी इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ ठेवला होता, मी कुठल्याही मीडियाला हा व्हिडिओ दिला नव्हता. माझ्या स्टोरीवरुनचा हा व्हिडिओ कुणीतरी उचलला आणि तो पुणे अपघातातील अल्पवयीन मुलगा *** अग्रवाल याच्या नावाने व्हायरल झाला. मला तर व्हायरल व्हायचंच होतं, मी फेमस झालो. माझ्या मित्रांनीही मला कॉन्टॅक्ट करुन मी फेमस झाल्याचं म्हटलं. त्यानंतर, ते मला पोर्शे कार मागू लागले. पण, माझ्याजवळ एक्टीव्हा देखील नाही, मग पोर्शे कार कुठून देऊ, असं मी मित्रांना म्हणल्याचं आर्यनने सांगितलं. तसेच, 
असे अपघात होणारच आहेत, जे झालं ते झालं, जे गेले ते आता परत तर येणार नाहीत, असेही तो म्हणतो. सरकार काहीच करणार नाही, त्यांना जे करायचंय तेच करणार असे म्हणत सरकारच्या कार्यक्षमेवरही त्याने भाष्य केलं आहे.


मी फेमस झालो 


आर्यन निखरा हा 22 वर्षांचा दिल्लीतील रहिवाशी आहे, तो कंटेट क्रिएटर आहे. आर्यनने hbt या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत या व्हायरल व्हिडिओमागील संपूर्ण कथाच सांगितली. तसेच, मी फेमस झालोय, मला लोकं ओखखायला लागली, मला हेच पाहिजे होतं असेही त्यांने म्हटलं आहे.


आईने रडत रडत सांगितलं


अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांनी स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ केला. हा माझा मुलगा नसून  मुलाचा व्हिडीओ फेक असल्याचं म्हणत शिवानी अग्रवाल यांनी पोलिसांना विनंती केली. यावेळी बोलताना बिल्डरपुत्राची आई ढसाढसा रडली. बिल्डरपुत्राची आई म्हणाली, मी मीडियाला विनंती करते की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ तो माझ्या लेकाचा नाही. तो फेक व्हिडीओ आहे. माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे. मी पोलीस कमिशनरांना विनंती करते की, त्याला प्रोटेक्ट करा,  प्लीज माझ्या मुलाला वाचवा... 


व्हिडिओवर पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण


पुणे  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील याचा खुलासा केला आहे.अमितश कुमार म्हणाले, व्हिडीओ फेक आहेत. कुणी तयार केलेत ते तपासले आहेत. अल्पवयीन आरोपीने तयार केलेले नाही. या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.