North Korea: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन (Kim-Jong-Un) अनेकदा त्याच्या क्रूरतेमुळे आणि विचित्र शिक्षांमुळे जगभरात चर्चेत असतो. तो सुनावत असलेल्या भयानक शिक्षेमुळे केवळ उत्तर कोरियाचे (North Korea) लोकच नाहीस, तर संपूर्ण जग त्याला घाबरतं. एखादा माणूस इतका क्रूर कसा असू शकतो? असा प्रश्न त्याच्याकडे पाहून सर्वांनाच पडतो.


किम जोंगच्या क्रूरतेच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात. आता पुन्हा एकदा अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. किमने त्याच्या एका जनरलला एवढी भयानक शिक्षा दिली की, हे ऐकून प्रत्येकाच्याच अंगावर काटा येईल.


नेमकं घडलं काय?


मिररच्या रिपोर्टनुसार, किम जोंगच्या जनरलवर गंभीर आरोप करण्यात आला होता. त्याच्या जनरलने सत्तापालटाचा कट रचल्याचं बोललं जात आहे. किम जोंग-उनला जनरलच्या योजनेची माहिती मिळाली. मग काय, प्रत्येक वेळी जसं घडतं तसंच यावेळीही घडताना दिसलं. आजपर्यंत किम जोंगने देशद्रोह्यांना एकदाही सोडलेलं नाही, मग तो समोरचा कितीही मोठा असो. तसंच सत्तापालटाचा कट रचणाऱ्या जनरलला देखील किमने इतकी वेदनादायक फाशीची शिक्षा दिली की हे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल.


गद्दारी केल्याने किम संतापला


किम जोंगच्या जनरलचं नाव आणि ओळख सध्या तरी उघड करण्यात आलेली नाही. हुकूमशहा किम जोंग उनला सत्तेवरून घालवण्यासाठी बंडाचा कट रचल्याचा आरोप जनरलवर झाला. हे सगळं समजल्यावर किम इतका संतापला की, त्याने एकदाही त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा विचार केला नाही. आता या विश्वासघातासाठी किमने जनरलला काय शिक्षा दिली ते पाहा.


तडफडून झाला जनरलचा मृत्यू


किमच्या र्योंगसाँग निवासस्थानात एक मोठा फिश टँक आहे. किमचं हे विशाल मत्स्यालय ब्राझिलमधून आयात केलेल्या शेकडो पिरान्हा माशांनी भरलेलं आहे. तर सर्वप्रथम किमने जनरलचे हात आणि डोकं चाकूने कापलं आणि शरीरापासून वेगळं केलं. यानंतर त्याने त्याचा मृतदेह जीवघेण्या माशांनी भरलेल्या फिश टॅंकमध्ये फेकून दिला. जनरलच्या अंगावर एवढ्या जखमा झाल्या होत्या की तिथेच त्याचा तडफडून मृत्यू झाला.


कुठून आली अशा शिक्षेची कल्पना?


रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किमच्या डोक्यात देशद्रोह्यांना असं मारण्याची आयडिया 1977 चा जेम्स बाँडचा चित्रपट 'The Spy Who Loved Me' मधून सुचली. या चित्रपटात खलनायक कार्ल स्ट्रॉमबर्गने त्याच्या शत्रूंना एका टॅंकमध्ये टाकून ठार मारलं, ज्यामध्ये जीवघेणे शार्क मोठ्या संख्येने उपस्थित होते.


किमकडे असेच पिरान्हा मासे आहेत. पिरान्हा माशाचे दात खूप धारदार असतात. हे मासे मानवी शरीराचे तुकडे करू शकतात आणि काही मिनिटांत मांस खाऊन टाकतात. किमबाबत असं म्हटलं जातं की, 2011 मध्ये सत्तेत आल्यापासून त्याने एकूण 16 वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकारच्या फाशीची शिक्षा दिली आहे.


हेही वाचा:


GK: भारतातील शेतकरी इस्रायलला का जातात? 'हे' आहे त्याचं कारण