अमेरिका: जगात क्वचितच असा कुणी व्यक्ती असेल ज्याला कशाचीच भीती वाटत नसेल. कुणाला उंचीची (Height) भीती वाटते, तर कुणाला पाण्यात (Water) पोहोचण्याची. अनेकांना किटकांची किंवा प्राण्यांचीही भीती वाटते. कुणी सापाला घाबरतो, तर कुणी कुत्र्याला. सर्वाधिक लोक हे कोळीला (Spider) घाबरतात. अमेरिकेतील (America) एक महिला स्पायडरला इतकी घाबरली की तिने चालत्या कारमधून उडी मारली आणि तिची कार सरळ जाऊन नदीत कोसळली, यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की ती एवढ्याशा स्पायडरला किती घाबरली असावी.
नेमकं घडलं काय?
त्याचं झालं असं की, अमेरिकेच्या जॉर्जिया (Georgia) राज्यातील एक महिला तिची कार नदी किनारी पार्क करत होती. तिला कारवर ठेवलेली कायाक (छोटी बोट) नदीत उतरवायची होती. ती घरुन छोटी होडी घेऊन आली होती, जी तिने कारच्या टपावर ठेवली होती. तिने नदीला अगदी लागूनच कार पार्क करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन वर ठेवलेल्या बोटीला थोडा धक्का दिला की ती नदीत पडेल. या महिलेचा प्लॅन तर एकदम भारी होता. पण याच दरम्यान तिच्यासोबत असं काही झालं, ज्यामुळे तिचा थरकाप उडाला.
नदीत कशी बुडाली कार?
ही महिला तिची कार नदीलगत पार्क करत होती, नेमकं तेव्हाच तिच्या अंगावर स्पायडर पडतो. आता त्या स्पायडरला पाहून ती इतकी घाबरते की, जोरजोरात ओरडायला सुरुवात करते आणि सीटबेल्ट काढून थेट कारच्या बाहेरच उडी घेते. तिने हे असं केलं त्यावेळी तिची कार रिव्हर्समध्ये होती. ही महिला इतकी घाबरली होती की ती पळत कारपासून एकदम दूर गेली आणि तिने मागे वळून कारकडे पाहिलंसुद्धा नाही, ना कारला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोळ्यासमोरच कार आणि बोट दोन्ही नदीत वाहून गेले.
नदीत गायब झाली कार आणि बोट
जॉर्जिया स्टेट पेट्रोल टीमने सांगितलं की, महिलेने त्यांना सविस्तर घटनेची माहिती दिली. यानंतर टीम 164 मैल दूर असलेल्या नदीजवळ पोहोचली. पण बचाव पथक नदीकडे पोहोचेपर्यंत कार आणि बोट दोन्ही पूर्णपणे नदीत बुडाले होते. जॉर्जिया पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, कार काही सेकंदातच नदीच्या तळाशी बुडाली आणि गायब झाली. नदीत असलेल्या एका बोटीच्या सहाय्याने कार शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण यात पोलिसांना यश मिळालं नाही.
हेही वाचा:
Trending: हॉरर फिल्मसाठी झाली काळ्या मांजरींची ऑडिशन; 152 मांजरींनी लावली रांग, फोटो व्हायरल