Noodles Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. या जगात असे काही नमुने आहेत, ज्यांचे स्टंट पाहून कधी कधी आपला डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. फ्लोरिडामध्ये (Florida) राहणारी टॅटू आर्टिस्ट व्ही ड्युकेटचा (Vii Duquette) हा व्हिडिओ आहे, जो काही विचित्र कारणांमुळे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.


तरुणीने जिभेवर केली अनोखी सर्जरी


आता ही तरुणी टॅटूमुळे प्रसिद्धी झोतात आली असं तुम्ही गृहीत धरत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. तिच्या प्रसिद्धीमागचं (Popularity) कारण आहे तिची जीभ (Tongue). वास्तविक, व्हीने तिची जीभ शस्त्रक्रिया (Tongue Surgery) करुन कापली आहे. या तरुणीची जीभ दोन भागांत विभागली गेली आहे, जी अगदी हाताप्रमाणे काम करत असल्याचं जाणवतं. या तरुणीने तिचा नूडल्स खातानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला आहे, जो पाहून तुम्हालाच प्रश्न पडेल.






व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ


व्हीने बनवलेल्या व्हिडिओमध्ये, ती सर्जरी केल्यावर कशा प्रकारे नूडल्स खाते हे दाखवलं आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम हँडल 'viiduquette' वर कॅप्शनसह शेअर केला आहे, "इंटरनेटवर विचित्र गोष्टी करण्याचं काम माझ्यावर सोडा, ज्यांनी या कारणामुळे माझं प्रोफाईल उघडलं, त्यांचे धन्यवाद." असं ती म्हणते.


या व्हिडीओची इतकी चर्चा कशामुळे?


व्हिडिओमध्ये टॅटू आर्टिस्ट तिच्या दुभागलेल्या जिभेवर नियंत्रण दाखवताना दिसत आहे. या तरुणीने काट्याच्या चमच्याने नूडल्स घेतले आणि ते खाण्यासाठी तोंड उघडलं असता, तिची जीभ दोन भागांमध्ये विभागली होती. ज्या प्रमाणे हाताने आपण एखादा घास पकडतो, त्याच प्रमाणे तिने जिभेने हे नूडल्स पकडले आणि तोंडात टाकले.


तरुणीने जिभेचा हा खेळ दाखवून साऱ्यांनाच थक्क करुन टाकलं आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला. काहींना ही कल्पना आवडली, तर काहींनी अशा प्रकारच्या उद्योगांचा तिरस्कार केला. अशा प्रकारच्या सर्जरीतून गेल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुकही केलं. काही दिवसांतच या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.


हेही वाचा:


VIDEO: गर्लफ्रेंडला मागे बसवून 'धूम' स्टाईलने पळवत होता बाईक; अचानक व्हॅनशी टक्कर अन् दोघेही हवेत...