Viral Video: 'नजर हटी, दुर्घटना घटी'... असं वाटतं ही म्हण आजच्या युगातील मुलांसाठीच निर्माण झाली असावी. देशभरात दर दिवशी अनेक रस्ते अपघात (Accident) होतात, हे तर सर्वांनाच माहीत आहे. अनेक निष्पाप लोक या अपघातांमध्ये आपला जीव गमावून बसतात. असं असताना देशात काही असेही लोक आहेत, जे स्वत:च्या चुकीमुळे, स्वत:च्या कर्माने अपघातांना बळी पडतात.
स्टंटबाजी करुन आपले प्राण पणाला लावणारे अनेक अवलिया असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा धोकादायक पद्धतीने बाईक चालवत आहे.
नेमकं काय घडलं?
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, 2 बाईक राईडर्स बाईकवर मागे त्यांच्या गर्लफ्रेंडला बसवून तुफानी अंदाजात आणि भरधाव वेगात बाईक चालवत आहेत. तर मागच्या बाईकवरुन येणारा एकजण या दोघांचा व्हिडीओ काढत आहे.
आता यातच, दोन बाईक राईडर्सपैकी एकाने इतक्या जोरात बाईक चालवली की, एका वेळानंतर त्याचा त्याच्या बाईकवर कंट्रोल राहिला नाही. पहिलं त्याला वाटलं संपूर्ण रस्ता रिकामा आहे, या रस्त्यावर कोणत्या गाड्या येत-जात नाही. पण त्याच वेळी, समोरुन एक व्हॅन आली. व्हॅनही वेगात होती आणि बाईकवाला देखील वेगात होता. अशातच बाईक राईडरची व्हॅनशी जोरदार धडक झाली. यानंतर बाईक चालवणारा मुलगा आणि त्याच्या मागे बसलेली त्याची गर्लफ्रेंड दोघेही हवेत उडाले आणि जोरात तोंडावर आपटले.
स्टंटबाजीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल
बाईक स्टंटचा हा काही पहिला व्हिडीओ नाही, अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तरी हे पाहूनही लोकांचे डोळे उघडत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्ध (Popular) होण्यासाठी तरुणाई असे अनेक प्रकारचे स्टंट करताना दिसतात. बऱ्याच लोकांनी तर असं करताना जीवही गमावला आहे. तरीही अशा प्रकारच्या दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत.
लोकांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये म्हटलं की, "मुलीला पूर्ण थ्रील मिळालं असेल, बोलत असेल माझ्यावाल्याकडे तर KTM आहे." तर दुसऱ्या एकाने या व्हिडीओवर म्हटलं की, "मुलीला देखील हेल्मेट दिलं पाहिजे होतं" तर आणखी एका व्यक्तीने म्हटलं, "यावर बोलून काही अर्थ नाही, कारण अशाच लोकांमुळे निष्पाप लोकांचा जीव जातो"
हेही वाचा:
Canada: लाखो विद्यार्थी, लाखो NRI... कॅनडात नेमके किती भारतीय लोक राहतात?