New Year Viral Video : आज 2023 (New Year 2023) नववर्षाचा पहिला दिवस, आपण 2022(Year 2022) वर्षाचा निरोप घेतला आहे आणि नवीन वर्ष 2023 चे स्वागत करत आहोत. नवीन वर्ष साजरे (New Year) करण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्साह दिसत आहे. याच्याशी संबंधित हजारो व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. यामध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करताना दिसत आहेत. पण या सगळ्यात एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही वेळातच या व्हिडीओला हजारो आणि लाखो वेळा पाहिले गेले आहे.


 


वाइन ऐवजी मिळाले एक ग्लास दूध 


व्हायरल झालेला व्हिडिओ नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनशी संबंधित आहे. यामध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक दारू खरेदी करण्यासाठी दुकानात पोहोचल्याचे दिसून आले. दुकानात दारू खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या व्हिडीओमध्ये सर्वकाही आलबेल दिसते, पण अचानक असे काही दिसले की तुम्हाला तुमचे हसू थांबवणे कठीण होईल.


 


 






 


 मजेशीर व्हिडीओ व्हायरल


या व्हिडीओमध्ये लोक दारू खरेदी करत होते, तेवढ्यात आणखी काही लोक आले. प्रत्येकाच्या हातात एक मोठा ट्रे आहे आणि त्यात दुधाचे ग्लास आहेत. दारू विकत घेण्यासाठी आलेल्या लोकांना तो एक ग्लास दूध देत असल्याचे या मजेशीर व्हिडीओमध्ये दिसत आहे.


 


इतर बातम्या


Viral Video : कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या तलावात डुबकी मारणारी ती मुलगी कोण? बाहेर येताच घेतली कॉफी, नेटकरी थक्क!