Indian tech company:  तुम्ही कामाप्रति कितीही प्रमाणिक असताल तरी सुट्टीच्या दिवशी ऑफिसचा फोन अथवा मेसेज प्रत्येकला नकोच असतो. पण काही कंपनीमध्ये सुट्टीच्या दिवशीही तुम्हाला नेहमी ऑफिसच्या ग्रुपवर ऍक्टिव्ह राहावं लागतं. लागेल ते काम करावं लागतं, अशी अपेक्षा केली जाते. यापेशा गंभीर बाब म्हणजे, कंपनीच्या मालकाला, बॉसला, सीईओला आणि तुमच्यासारख्या अन्य कर्मचाराऱ्यालाही यात वावगं वाटत नाही. पण आता ड्रीम 11 या कंपनीनं सर्व कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतलाय. सुट्टीच्या दिवशी सहकारी कर्मचाऱ्याला त्रास देणाऱ्याला एक लाखाचा दंड ठोठावला जाईल, असा निर्णय ड्रीम 11 कंपनीनं घेतला आहे. (Indian tech company to impose Rs 1 lakh fine on employees for disturbing colleagues on off days)


ड्रीम ११ या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.  त्यांनी जाहीर केलेय की, सुट्टीच्या दिवशी काम करण्यासाठी कुणीही कर्मचाऱ्याला त्रास दिला तर त्याला मोठा दंड आकारला जाईल. कर्मचाऱ्यांना सुट्ट्या चांगल्या पद्धतीने घालवता याव्यात त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.  स्पोर्ट्स कंपनी ड्रीम 11 कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी  Dream 11 Unplug ही पॉलिसी आणली आहे. त्यानुसार, सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्याला कार्यालयातून कोणताही फोन अथवा मेसेज जाणार नाही. कामासाठी एखाद्यानं सहकारी कर्मचाऱ्याला त्रास दिला तर त्याला आर्थिक दंड केला जाईल. कंपनी Dream 11 Unplug या  धोरणाची घोषणा करुन थांबली नाही तर याविषयीची कडक अंमलबजावणीही करणार असल्याचं सांगितलं जातेय.  नव्या धोरणाची माहिती कंपनीनं Linkedin वर पोस्ट करत दिली आहे.


कंपनीच्या या धोरणामुळे कर्मचारी आनंदात आहेत. या धोरणामुळे सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून अथवा सिनिअर सहकाऱ्याकडून कोणताही त्रास होणार नाही. कार्यालयाकडून कॉल, ई-मेल, मॅसेज अथवा व्हॉट्सअपवरुन कामाची विचारणा करण्यात येणार नाही. जर कुणी अशी विचारणा केली तर त्याला एक लाख रुपयांचा आर्थिक दंड होणार आहे. ड्रीम 11 कंपनीचे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी Dream 11 Unplug या पॉलिसीबद्दल माहिती दिली. अनप्लग काळात जर कर्मचाऱ्याच्या अन्य कर्मचाऱ्याने कामासंबंधीत फोन अथवा मेस केला तर त्याला एक लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.  या धोरणामुळे कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्यावर निर्भर नसल्याचा थेट संदेशही देण्यात आला आहे.


ही बातमी वाचाच :
Kolhapur Latest Crime News Update : नात्यातील अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन नराधमाकडून अत्याचार; पीडिताला दिवस गेल्याने प्रकरण आलं उजेडात