Bihar Wedding Viral News : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम नसतं, या ओळी तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील, पण अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. सासू आणि जावयाची एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. दोघांचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर दोघांनी लग्न केलं आहे.  दोघांनीही समाजाचे नियम बाजूला ठेवून लग्न केलं आहे. सासूच्या इच्छेनुसार जावयाने सर्वांसमोर लग्नगाठ बांधली आहे. या प्रेमकथेची सर्वात मनोरंजक बाब म्हणजे सासऱ्यानेच जावयासोबत सासूचं लग्न लावून दिलं आहे. 


अजब प्रेम की गजब कहानी! 


बिहारमधील बांका येथे ही घटना समोर आली आहे. आता या अनोख्या प्रेमकथेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. जावयाने सासूसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. बिहारमधील बांका जिल्ह्यात जावई आपल्याच सासूच्या प्रेमात पडला. या दोघांचे प्रेम इतकं फुललं की, सासू आणि जावयाने लग्न केलं. सासू जावयाची तिसरी पत्नी बनली. हे प्रकरण बांका जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील छत्रपाल पंचायतीच्या हिरमोती गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय दिलेश्वर दरवे यांची पत्नी 45 वर्षीय गीता देवी आणि जावई सिकंदर यादव यांनी लग्न केलं आहे.


सासूचं जावयावर जडलं प्रेम


हिरमोती गावातील रहिवासी असलेल्या दिलेश्वर दरवे यांनी सुमारे अडीच दशकांपूर्वी जिल्ह्यातील कटोरिया ब्लॉकमधील धोबनी येथील सिकंदर यादव यांच्याशी आपल्या मुलीचं लग्न केलं. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांची पहिली पत्नी मरण पावली. दुसरं लग्न झाल्यावर सिकंदरच्या आयुष्यात चांगले दिवस आले. पण, त्याचं हे दुसरं लग्न अयशस्वी ठरलं. 


नेमकं प्रकरण काय?


सिकंदरने त्याच्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला. इतकं सगळं असूनही तो त्याच्या पहिल्या पत्नीच्या घरी येत राहिला. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती. दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सिकंदरचे आयुष्य एकाकी झाले होते. दरम्यान, तो त्याची 45 वर्षीय सासू गीता देवी यांच्याशी फोनवर बोलत राहिला. या संवादाचे रुपांतर प्रेमात कधी झाले, ते दोघांनाही कळलं नाही. या दोघांच्या प्रेम संबंधावर सासरे दिलेश्वर दरवे यांना संशय आला.


सासऱ्यानेच लावून दिलं लग्न 


जावई आणि सासू यांच्यातील प्रेमसंबंध वाढले. सासरे दिलेश्वर यांना ही बाब कळल्यावर त्यांनी या दोघांच्या प्रेमासाठी पुढाकार घेतला. सासू-जावयाची प्रेमकहाणी त्यांनी सर्वात आधी समाजातील लोकांना सांगितली आणि पटवून दिली. दरम्यान, जावई आणि सासूने खुलेपणाने एकमेकांविषयीचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं. सासरच मंडळींनीही त्यांच्या नात्याला होकार दिला. यानंतर सासऱ्याच्या समोर जावयाने सासूच्या भांगेत कुंकू भरलं. नंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सुनेचं सासूवर जडलं प्रेम! शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती, मोबाईलवर दाखवते आक्षेपार्ह व्हिडीओ