Flight Viral Video : फ्लाईटच्या उड्डाणात अडथळा आणण्याचे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत. अनेक चुकीचे  प्रकार फ्लाईटमध्ये आजवर घडले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती स्वतःला अल्लाहचा गुलाम म्हणवत आहे. एवढेच नाही तर तो विमानातील इतर प्रवाशांना देखील विचारत होता की, ते अल्लाहचे गुलाम आहेत का. हा व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने विमान बॉम्बने उडवण्याची धमकीही दिली. आश्चर्याची बाब म्हणजे विमान हवेत उडत असताना ही व्यक्ती असे करत होती. संबंधित व्यक्तीच्या दोन व्हिडीओने ट्विटरवर चांगलाच धूमाकूळ घातला आहे. लोकांनी यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया मांडल्या आहेत. 






विमानात बॉम्ब टाकण्याची दिली धमकी






मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलेशिया  एअरलाईन्सच्या (Airlines) MH-122 फ्लाइटमध्ये ही घटना घडली. हे विमान सिडनीहून क्वॉलालम्पूरला जात होतं. संबंधित व्यक्तीचे नाव मोहम्मद असल्याचे सांगितले जात आहे. त्याने केलेल्या या भयानक कृत्यामुळे विमानातील (Flight) सर्व प्रवासी चांगलेच घाबरुन गेलेले दिसत आहेत. तर तो प्रत्येकाकडे बोट दाखवून विचारत आहे, तुम्ही अल्लाचे गुलाम आहात का? त्या व्यक्तीने ही धमकी दिल्यानंतर त्याची बॅग चेक करण्यात आली. मात्र त्यात कोणतेही नुकसान करणाऱ्या वस्तू आढळल्या नाहीत. या विमानात एकूण 194 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मलेशिया एअरलाईन्सने दिली. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता विमान पुन्हा सिडनीला (Sydney) नेण्यात आलं आणि इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं विमान कंपनीनं सांगितलं. या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे तर त्याच्याविरोधात खटला उभा राहण्याची तयारी सुरु करण्यात आला आहे.


 व्यक्तीला अटक करण्यात आली


अनेकवेळा धमक्या देत असताना या व्यक्तीने बॅगेत हातही टाकला, त्यामुळे लोक घाबरले. त्याचवेळी, हा व्यक्ती विमानात नमाज अदा करत असल्याचे दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीच्या या कृत्यानंतर ते विमान सिडनी विमानतळावर उतरवण्यात आले आणि पोलिसांनी आरोपी मोहम्मदला अटक केली.


इतर महत्वाच्या बातम्या


Sindhudurg: तळकोकणात आढळला दुर्मिळ प्रजातीतील पोवळा साप; जाडी करंगळी एवढी अन् भला मोठा लांब