Man selling milk on Harley Davidson : तुम्ही आतापर्यंत सायकलवरून किंवा पायी दूध विकणारा पाहिला असेल, पण तुम्ही कधी कुणाला महागड्या बाईकवरून दूध विकताना पाहिले आहे का? बहुतेक तरी तुमच्या नजरेला असं दृश्यं पडलं नसेल. पण आम्ही आज तुम्हाला असाच एक अवलिया दाखवणार आहोत, जो चक्क महागड्या बाईकवरून दूध विकताना दिसत आहे. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमुळे चांगले मनोरंजन होते.


इंस्टाग्रामवर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती महागड्या बाईकवरून दूध विकताना दिसत आहे. हा व्यक्ती चक्क महागड्या हार्ले डेव्हिडसन (Harley Davidson) बाईकवरून घरोघरी जाऊन दूध विकताना दिसत आहे. इंस्टाग्रामवरील या व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच चकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती महागड्या हार्ले डेविडसन बाईकवरून दूध विकत असल्याचे दिसत आहे. रीलमध्ये एक दूधवाला आलिशान बाईकवरून दूध विकताना दिसत आहे. 


पाहा व्हायरल व्हिडीओ






हार्ले डेव्हिडसन ही एक उत्तम बाईक आहे, ही बाईक फार महाग आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या रीलमध्ये निळ्या रंगाचा हुडी घातलेला एक माणूस हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवरून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दूध विकताना दिसत आहे. या महागड्या बाईकवर त्याने दोन्ही बाजूला दुधाचे मोठे कॅन ठेवलेले दिसत आहेत.


ट्राइक वापरून दूध विक्री, आनंद महिंद्राही प्रभावित


या वर्षाच्या सुरुवातीला, व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक माणूस दूध विकण्यासाठी ट्राइकचा वापर करत असल्याचे दिसून आले होते. ही ट्राइक पाहिल्यावर रेसिंग कारची आठवण होते. ही ट्राइक विजेवर चालते आणि त्यामध्ये पुढच्या बाजूला दोन बॅटरी होत्या. महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा हेही देशी जुगाडवर प्रभावित झाले होते.






महत्त्वाच्या इतर बातम्या


Viral Video : ड्रायव्हर जोमात, नेटकरी कोमात! विना चाकांचा ट्रक कसा काय धावला? व्हिडीओ पाहून नेटकरी चकित