Viral Video: भारतीय लोक डोक्याने चतुर तर आहेच, पण चांगले जुगाडू देखील आहेत. कोणत्या वेळी काय पाऊल उचलावं? हे त्यांना चांगलं समजतं. प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला चांगलं सिद्ध करण्यात भारतीय (Indian) नेहमीच यशस्वी ठरले आहेत. भारतात इतके विद्वान आहेत की, त्यातले काही फार शिकलेले नसूनही जबरदस्त शक्कल लढवतात.


कुणी झोपायच्या खाटेचा (Cot) वापर करुन चारचाकी गाडी (Car) बनवतो, तर कुणी काही अजून पराक्रम करत असतो. इंटरनेटवर असे बरेच व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, "डोकं असावं तर असं".


कॅब बुक होत नव्हती म्हणून लढवली शक्कल


व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणार्‍या तरुणाने घरी पोहोचण्यासाठी एक अशी युक्ती लढवली की आता सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. या तरुणाचं नाव सार्थक सचदेवा आहे. त्याचं झालं असं की, सार्थक रॉयल हेरिटेज मॉलच्या बाहेर उभा राहून घरी जाण्यासाठी कॅब (Taxi) किंवा ऑटो (Auto) शोधत होता. बराच वेळ झाला तरी त्याला ना ऑटो मिळते, ना कॅब.


पहिलं सार्थकला कळेच ना की, आता करु काय? ऑनलाईन कॅब बुक करायचं ट्राय केलं, पण ऑनलाईन कॅब देखील बुक होत नव्हती. मात्र, याच दरम्यान त्याला एक शानदार कल्पना सुचली, जी पाहून सोशल मीडियावरील लोकही अवाक झाले आणि त्याच्या युक्तीवर खूश झाले. या घटनेचा व्हिडिओ सार्थक सचदेवाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.


झोमॅटोवरुन ऑर्डर केलं जेवण


आता घरी जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी मिळत नव्हती. मग सार्थकने झोमॅटो अॅप उघडलं. ज्या मॉलसमोर तो उभा होता, त्याच मॉलमधील एका रेस्टॉरंटमधून त्याने जेवण ऑर्डर केलं. जेवणाची ऑर्डर देताना त्याने डिलिव्हरीसाठी त्याच्या घरचा पत्ता टाकला. यानंतर तो डिलिव्हरी बॉय त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बाहेर येण्याची वाट पाहू लागला.


काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने डिलिव्हरी बॉयला फोन केला आणि त्याच्यावर ओढावलेली परिस्थिती सांगितली. यानंतर डिलिव्हरी बॉय त्याच्याकडे आला, तो देखील या तरुणाने केलेला जुगाड पाहून थक्क झाला. डिलिव्हरी बॉय तरुणाच्या कल्पनेने इतका हैराण झाला की, त्याने त्या मुलासोबत सेल्फी काढायलाच सुरुवात केली.




डिलिव्हरी बॉयने पोहोचवलं घरी


डिलिव्हरी बॉयने रेस्टॉरंटमधून सार्थकची ऑर्डर रिसिव्ह केली आणि त्याला बाईकवर बसवून घरपर्यंत सोडलं. घरी पोहोचल्यावर सार्थकने त्याचं जेवण डिलिव्हरी बॉयसोबत शेअर केलं. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पण बऱ्याच जणांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने म्हटलं, "हे सगळं ठीक आहे, पण कॅमेरामॅनला घरी कोण घेऊन गेलं?" तर दुसऱ्याने म्हटलं, "मॉर्डन प्रॉब्लम्ससाठी मॉर्डन सोल्युशनची गरज असते, हे वाक्य तुझ्यासाठीच बनलं आहे"


हेही वाचा:


मुलगा माझाच का? शंका दूर करण्यासाठी बापाने केली DNA टेस्ट, रिपोर्ट समोर आल्यानंतर पायाखलची जमीन सरकली