मुंबई : काही जण मानतात की, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला शांती मिळते. तर, काही जण मानतात की मृत्यूनंतरही आत्म्याला शांती मिळणं कठीण आहे. एका देशात तर मृत्यूनंतर कबरीत दफन करण्यासाठीही भाडं द्यावं लागतं. हो, तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे, एका देशात मृतदेह कबरीमध्ये दफन ठेवण्यासाठी भाडं द्यावं लागतं. ग्वाटेमाला देशामध्ये हा विचित्र प्रकार अस्तित्वात आहे. ग्वाटेमाला देशात बहुमजली कब्रस्थान आहे, जिथे मृतदेह दफन ठेवण्यासाठी दरमहा भाडं भरावं लागतं.


येथे मृतांनाही कबरीत राहण्यासाठी द्यावं लागतं भाडं


मध्ये अमेरिकेतील ग्वाटेमाला देशात ही पद्धत आहे. येथे बहुमजली स्मशानभूमी पद्धत प्रचलित आहेत, आपल्या प्रियजनांना दफन करण्यासाठी कुटुंबांला दरमहा कबरीसाठी भाडं द्यावं लागतं. एखाद्या महिन्यात कबरीचे भाडे न दिल्यास मृतदेह बहुमजली कबरीतून बाहेर काढून सामूहिक कबरीत टाकला जातो. जागेअभावी येथे अनेक बहुमजली स्मशानभूमी बांधण्यात सुरुवात झाली. 


कबरीसाठी द्यावं लागतं भाडं


ग्वाटेमाला देशात जागेअभावी अनेक बहुमजली स्मशानभूमी बांधण्यात आली. या देशात लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्याने हा नियम बनवण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. येथे श्रीमंत लोक त्यांच्या हयातीत कबरीसाठी पैशाची व्यवस्था करतात. तर, काही जणांचे परिजन किंवा कुटुंबीय त्यांच्या कबरीसाठीचं भाडं भरतात. पण गोरगरिब जनतेसाठी हे आवाक्या बाहेरचं आहे.


सामूहिक कबरीची व्यवस्था


प्रशासनाने प्रत्येक शहराबाहेर एक सामुहिक मैदान तयार केलं आहे, जिथे सामूहिक स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे. येथे दरवर्षी ज्या मृतदेहांचे कुटुंबीय किंवा प्रियजन वेळेवर भाडे देऊ शकत नाही त्यांचे मृतदेह बहुमजली कबरीतून काढून या सामूहिक कबरीमध्ये दफन केले जातात.


कबरींचं भाडंही खूप जास्त


आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य अमेरिकन देश ग्वाटेमालामध्ये असं घडतं. येथे जागेअभावी अनेक बहुमजली स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. येथे बहुमजली स्मशानभूमीतील कबरीसाठी मृतदेहाच्या नातेवाईकांना दर महिन्याला भाडं द्यावं लागतं. एखाद्या नातेवाईकाच्या कबरीचा मालक एक महिन्याचे भाडे देऊ शकत नसेल, तर मृतदेह त्या कबरीतून काढून सामूहिक कबरीत ठेवला जातो. त्यानंतर त्याच्या जागी दुसरा मृतदेह कबरीत पुरला जातो. या कबरींचं भाडंही खूप जास्त असल्याचं सांगितलं जातं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती! शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं बाळ काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?