Viral Video : देशभरात दिवाळी (Diwali 2022) उत्साहात साजरी केली जात आहे. लहानथोर सर्वजण दिवाळी जल्लोषात साजरी करत आहेत. एकमेकांना गोड-गोड मिठाई, पदार्थ भरवून आणि फटाके (Fireworks) फोडत सर्वजण दिवाळीचा आनंद घेत आहेत. दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या दिवाळी सेलिब्रिशनचे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत. अशातच एका व्यक्तीचा फटाक्यांसोबत केलेला स्टंट व्हायरल होत आहे. 


या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या फटाके फोडण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आहे. दिवाळीच्या फटाक्यांमधील रॉकेट पेटवण्यासाठी हा व्यक्ती माचिसची पेटी किंवा अगरबत्ती नाही तर, चक्क तोंडात धरलेल्या सिगरेटचा वापर करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या विचित्र स्टंटमुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


एकीकडे दिवाळीमध्ये ठिकठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या आणि अनेक जखमी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. तोंडात सिगारेट पेटवलेली सिगरेट पेटवून हा व्यक्ती त्यावर रॉकेटची वात धरून ती जाळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात अनेक रॉकेट आहेत. व्हिडीओमध्ये हा व्यक्ती तोंडातल्या सिगारेटने एकापाठोपाठ एक रॉकेट पेटवताना दिसतो, हे कृत्य खूप धोकादायक आहे. असे स्टंट करून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. कुणी असं करत असल्यास त्यांनाही असं करण्यापासून रोखा.


पाहा व्हायरल व्हिडीओ 






हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी मिश्किलपणे लिहिलं आहे की - 'नासाचे संस्थापक नक्कीच भारतातील होते.'


या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओला 22 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. या मजेदार व्हिडीओवर अनेक यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. 


नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया